गोविंदा याच्या पावाला मंगळवारी गोळी लागल्याच्या घटनेमुळे सर्वच हादरले, मंगळवारी पहाटे गोविंदा कोलकत्याला जाणार होता. परवाना असलेली रिव्हॉल्व्हर तो कपाटातून काढत होता त्यावेळी ती चुकून खाली पडली. रिव्हॉल्व्हरचे लॉक खुलेच नसल्याने गोळी झाडली गेली आणि ती गोविंदाच्या पायाला लागली. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले आणि डॉक्टरांनी गोळी काढली.
अनेक सेलिब्रिटींनी रुग्णालयात जाऊन गोविंदाच्या प्रकृतीची चौकशी केली, ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनीही गोविंदाची भेट घेऊन आल्यावर प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले, गोविदाची प्रकृती आता स्थिर आहे. लवकरच ती सुधारेल. तो सर्वांशी छान बोलत आहेत. त्याला भूल दिली होती. त्याचा परिणाम आता कमी झाला आहे. ही एक दुर्घटना होती. हे कसे इसले, का झाले याचे काहीही कारण नसते. तो आता एकदम ठीक आहे. दोन दिवसांत त्याला घरीही पाठविले जाईल. अन्य सेलिब्रिटींनीही रुग्णालयात जाऊन गोविंदाची विचारपूर केली. गोविंदाने मंगळवारी स्वतः रुग्णालयातील थरथरत्या आवाजातील ऑडिओ क्लिप शेअर करत आता आपण ठिक असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती.