ठाण्यातील एका इंटरनॅशनल मध्ये मतदान केल्यानंतर अभिनेता शशांक केतकरने शाळेबाहेरील कचऱ्याचा व्हिडिओ शेअर करत स्वच्छतेच्या प्रश्नावर भाष्य केलं आहे. कोणताही पक्ष निवडून आला तरी स्वच्छतेसारख्या मूलभूत विषयावर कोणीही गंभीरपणे लक्ष देणार नाही, अशी खंत त्याने व्यक्त केली. ही भावना नकारात्मक नसून वास्तव असल्याचंही त्याने स्पष्ट केलं असून, हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
Shashank Ketkar video viral during voting
निवडणुकीदरम्यान मतदानाचा हक्क बजावून बाहेर पडताच मराठी अभिनेता शशांक केतकरने केलेली प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ठाण्यातील एका International School मध्ये मतदान केल्यानंतर शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर असलेल्या अस्वच्छतेचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
व्हिडिओमध्ये मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा, दुर्गंधी आणि अस्ताव्यस्त परिस्थिती स्पष्टपणे दिसत असून, यावर शशांकने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “ज्या शाळेत मतदान केलं, त्या शाळेच्या अगदी बाहेर ही अवस्था आहे,” असं तो व्हिडिओमध्ये सांगतो. विशेष म्हणजे ही शाळा International School असल्याचं नमूद करत त्याने व्यवस्थेवर उपरोधिक टोला लगावला आहे.
अभिनेता शशांक केतकरने मतदानाचा हक्क बजावला. मत देऊन बाहेर पडल्यानंतर त्याने एक व्हिडिओ केला, ज्यामध्ये तो स्वत: दिसतो तसेच त्याने शाळेबाहेर असलेला कचऱ्याचा ढीगदेखील व्हिडिओत क्लिक केला. तेथील वस्तुस्थिती दाखवत संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे ठाण्यातील एक इंटरनॅशनल शाळेबाहेर ही दयनीय अवस्था असल्याचे त्याने मिश्किलपणे म्हटले आहे.
तो आपल्या पोस्टमध्ये काय म्हणाला- ठाण्यातील एका इंटरनॅशनल सकूलच्या अगदी दाराबाहेर असलेली अस्वच्छ अवस्था पाहून लेखकाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ज्या ठिकाणी मतदान झाले, तिथेच अशी परिस्थिती असणे हे व्यवस्थेचे आणि नागरिकांच्या उदासीनतेचे द्योतक असल्याचे शशांक म्हणाला. शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची असली तरी मूलभूत स्वच्छतेचा अभाव दिसून येतो, ह नकारातम्क नाही तर वास्तव परिस्थिती असल्याचे त्याने नमूद केले.
शशांकने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, त्याची ही भावना निराशावाद किंवा नकारात्मकतेतून आलेली नसून, वास्तवावर आधारित आहे. उद्या कोणत्याही पक्षाचा उमेदवार निवडून आला तरी ‘स्वच्छता’सारख्या मूलभूत प्रश्नावर कोणीही ठोस पुढाकार घेणार नाही, तसेच नागरिकही त्याकडे गांभीर्याने पाहणार नाहीत, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.