पुढारी ऑनलाईन डेस्क - बॉलीवूड सुपरस्टार शर्मिला टागोरने २०२३ मध्ये सांगितलं होतं की, त्यांनी कॅन्सरशी कशी लढाई केली. त्यांचे चाहते या गोष्टीमुळे खूप आश्चर्यचकीत होते की, त्यांनी या गोष्टीची भनक देखील लागू दिली नाही. पण आता त्यांची मुलगी आणि अभिनेत्री सोहा अली खानने त्या कठीण काळातील काही गोष्टी शेअर केल्या आहेत. एका युट्यूब चॅनलमध्ये सोहा अली खान म्हणाली, "माझ्या परिवारात खूप नुकसान झाला आहे. आम्ही सर्व जण तणावातून गेलो आहोत, जसे की प्रत्येकजण करतो."
शर्मिला यांनी पुढे म्हटलंय की, "माझी आई त्या खूप कमी लोकांपैकी एक होती, जिला स्टेज झिरोवर फुफ्फुसाच्या कॅन्सरची माहिती मिळाली होती, आणि कोणतीही कीमोथेरेपी नाही, काही नाही. त्यांच्या ते शरीरातून काढण्यास आले आणि ती आता पूर्णपणे ठिक आहे."
शर्मिला टागोर यांच्या आरोग्याच्या बाबतीत २०२३ मध्ये कॉफी विथ करणमध्ये जेव्हा शर्मिला या मुलगा सैफ अली खान सोबत उपस्थित होती. तेव्हा होस्ट करण जोहरने खुलासा केली की, शर्मिला टॅगोर यांना रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये शबाना आजमी यांच्या भूमिकेसाठी निवडण्यात आलं होतं. पण, आरोग्याच्या कारणास्तव ही भूमिका शर्मिला करू शकल्या नाहीत.
याबद्दल शर्मिला टागोर म्हणाल्या, "त्यावेळी कोविड होतं. त्यांनी कोविड लस दिली नव्हती. माझ्या कॅन्सनंतर... कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करु शकत नव्हते."
शर्मिला टागोर नुकताच बंगाली चित्रपट पुरतवानमध्ये दिसल्या. याआधी त्या २०२३ मध्ये मनोज वाजपेयी यांच्यासोबत गुलमोहरमध्ये दिसल्या. पुरतवानला बेस्ट फीचर फिल्म इन हिंदी आणि बेस्ट स्क्रीनप्ले (डायलॉग) साठी तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.