कपिल शर्माचा लोकप्रिय शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या ताज्या एपिसोडमध्ये ‘परम सुंदरी’च्या कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी सिद्धार्थ मल्होत्रा, जान्हवी कपूर, संजय कपूर, मनजोत सिंग आणि इनायत वर्मा या कलाकारांनी शोमध्ये अनेक रंजक किस्से शेअर केले. मात्र, या एपिसोडमधील सर्वात लक्षवेधी क्षण ठरला तो म्हणजे संजय कपूर यांनी त्यांची मुलगी शनाया कपूरबद्दल केलेला एक खुलासा.
यावेळी संजय यांनी सांगितले की, एकेकाळी शनायाला सिद्धार्थ मल्होत्रावर क्रश होता. ते म्हणाले, तो शनायाचा 13 वा वाढदिवस होता. त्यावेळी सिद्धार्थ ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता आणि शनायाला तो खूप आवडायचा. करण जोहरने तिला वाढदिवसाची भेट म्हणून सिद्धार्थला रात्री ठीक 12 वाजता आमच्या घरी पाठवले. यावर सिद्धार्थने लगेचच एक आठवण शेअर केली.
तो म्हणाला, मला एक मेसेज आला की, कोणाचा तरी वाढदिवस आहे. तो शनायाचा होता. म्हणून मी त्यांच्या घरी गेलो. यावर संजय यांनी आणखी एक गोष्ट उघड केली. ते म्हणाले, करणने सिड आणि वरुण (धवन) दोघांनाही जायला सांगितले होते, पण वरुण म्हणाला, ‘मी का जाऊ? ती तर सिडची फॅन आहे!