मुंबई : भारतीय मनातला सुपरस्टार शक्तिमान आता मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. मुकेश खन्ना यांच्या शक्तिमान ने ९० च्या काळात आबालबृद्धांवर गारुड घातले होते. आता या मोठ्या पडद्यावर येणाऱ्या फिल्ममध्ये शक्तिमान हा मुख्य रोल कोण करणार हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अनेकांना रणवीर सिंह हा ही भुमिका करुणार असे वाटत असतानाचा अचानक दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लु अर्जूनचे नाव चर्चेत आले आहे. आता स्वतः निर्मात्यांनी याबाबत अपडेट दिली आहे.
सोनी पिक्चरच्या बॅनरखाली ‘शक्तिमान’ बनत आहे. काही दिवसांपूर्वी रणवीर सिंह ऐवजी अलु अर्जून याचे शक्तिमानच्या रोलसाठी कास्टींग झाले आहे अशी बातमी आली. यामुळे अल्लू अर्जून चे फॅन खूष होते. पण अचानक चित्रपटाचे दिग्दर्शक बेसिल जोसेफ यांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. त्यामुळे रणवीर सिंगच्या चाहते सुखावले आहेत.
जोसेफ यांनी म्हटले की ‘शक्तिमान’हा रणवीर सिंहच्या व्यतिरीक्त कोणी होऊच शकत नाही, कास्टींगच्या बाबतीत अनेक अफवा पसरत असतात पण शक्तिमान रणवीर सिंहच्या सोबतच बनेल’ त्यांच्या या वक्तव्यामुळे या चित्रपटासाठी रणवीर सिंह याचे नाव फायनल होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.
शक्तिमान ही ९० च्या दशकात दूरदर्शनवर प्रसारित होणार्या मालिकेने मुलांना वेड लावले होत. मुकेश खन्ना यांचा गंगाधार व शक्तिमान ही दोन्ही रुपे अजूनही मनात घर करुन आहेत. मुकेश खन्ना यांनी एका ठिकाणी म्हटले होते की रणवीर सिंहला शक्तिमानच्या रुपात पाहणे त्यांना आवडणार नाही. पण अल्लू अर्जून या पात्राला न्याय देऊ शकतो.
दरम्यान या चित्रपटाबाबत सोनी पिक्चरने २०२२ मध्ये या चित्रपटाची घोषणा केली होती. त्याचा टिजरही युट्युबवर आहे. आता या गोष्टीला ३ वर्षे पूर्ण झाली आहेत पण अजूनही याचे शुटिंग सूरु झालेले नाही. सध्या रणवीर सिंह आदित्य धर याच्या धुरंधर व फरहान अख्तर याच्या डॉन ३ मध्ये काम करत आहे.