मुंबई : पुढारी ऑनलाईन
कोरोना काळात कलाकारांविषयीचे काही ना काही वृत्त रोज ऐकायला मिळत आहे. तर काही वेळा कलाकारांच्या निधनाच्या अफवा पसरतात. शक्तिमान फेम अभिनेते मुकेश खन्ना यांचे कोरोनाने निधन झाले, असेही वृत्त पसरले. परंतु, मुकेश यांनी स्वत: या वृत्ताचे खंडन केले. ते म्हणाले की, मी एकदम ठिक आहे.
मुकेश खन्ना यांचे मोठे भाऊ सतीश खन्ना यांचे कोरोनाने निधन झाले. सतीश खन्ना एक बिझनेसमॅन होते. त्यांचे वय ८५ होते. परंतु, मुकेश खन्ना यांच्या निधनाची बातमी पसरली. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुकेश खन्ना यांनी स्वत: या बातमीचे खंडन केले. आपण, एकदम ठिक असल्याचे ते म्हणाले. त्यांनी स्वत: आपल्या प्रकृतीबद्दल माहिती दिल्याने त्यांच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
त्यांनी लोकांना धन्यवाद दिले. ते म्हणाले, त्यांना हे ऐकून चांगलं वाटलं की, लोकांना त्यांची ठिक होण्याची चिंता आहे. मुकेश खन्ना यांनी आपल्या शुभचिंतकांना धन्यवाद दिले.
मुकेश खन्ना यांनी नव्व्दच्या दशकातील शक्तिमान मालिकेतून प्रेक्षकांवर राज केलं. महाभारताचे भीष्म पितामह म्हणून त्यांची ओळख आहे. बीआर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत मुकेश खन्ना यांनी 'भीष्म पितामह'ची भूमिका साकारली होती. आजदेखील त्यांचे लाखो चाहते आहेत. मागील वर्षी लॉकडाउनमध्ये रामायण आणि महाभारताच्या पुन्हा प्रसारणानंतर पुन्हा एकदा मुकेस खन्ना चर्चेत आले होते.