रजनीकांत यांच्या बहुचर्चित ‘जेलर-२’ चित्रपटात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान कॅमिओ भूमिकेत दिसणार असल्याची जोरदार चर्चा आहे. जर हे खरं ठरलं, तर दाक्षिणात्य बॉक्स ऑफिसवर मोठी त्सुनामी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘जेलर’ चित्रपट हिट झाल्यानंतर आता ‘जेलर-२’ची प्रतीक्षा फॅन्सना लागून राहिली आहे. अशातच या बहुचर्चित सिक्वेलबाबत एक मोठी बातमी समोर आलीय. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान ‘जेलर-२’मध्ये खास कॅमिओ भूमिकेत दिसणार आहे. सध्या सोशल मीडियावर एक्स अकाऊंटवर चर्चा सुरु आहे की, शाहरुख खानचा कॅमियो कन्फर्म झाला आहे. तो रजनीकांत यांच्या जेलर २ मध्ये कॅमियो करणार असल्याचे म्हटलं जात आहे. पण अद्याप याबाबत कुठलीही पुष्टी झालेली नाही.
तरी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतो आहे. एक्स अकांटवर हॅश टॅग शाहरुख खान हॅश टॅग जेलर२ टॅग सुरु आहेत. रजनीकांत आणि शाहरुख खान हे दोघेही आपल्या-आपल्या इंडस्ट्रीतील सर्वात मोठे सुपरस्टार मानले जातात. त्यामुळे हे दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये दिसले, तर तो क्षण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ऐतिहासिक ठरेल, असं अनेक चाहत्यांचं मत आहे.
'जेलर २' मध्ये विजय सेतुपति देखील आहे. त्याचा एक स्पेशल कॅमियो देखील असेल. मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख 'जेलर २' मध्ये रजनीकांत यांच्या मित्राची भूमिका साकारेल.
'जेलर २' मध्ये शाहरुख खान - विजय सेतुपति शिवाय अनेक स्टार्सचे कॅमियो असतील. मिथुन चक्रवर्ती यांनी एका मुसाखतीत कन्फर्म केलं होतं की, 'जेलर २' मध्ये शाहरुख खान देखील आहे. त्याची भूमिका अशी असेल की, रजनीकांत यांचा केवळ मित्रच नाही तर रजनीकांत आपल्या आयुष्यापेक्षा ज्यादा विश्वास त्याच्यावर करतात.
विजय सेतुपतिने याआधी शाहरुखसोबत 'जवान'मध्ये काम केलं होतं. चित्रपटात मोहनलाल, शिवराजकुमार, विद्या बालन, मिथुन चक्रवर्ती देखील आहेत. 'जेलर २' नेल्सन दिलीप दिग्दर्शित करत आहेत.