पुढारी ऑनलाईन डेस्क - शाहरुख खानने २ नोव्हेंबर रोजी आपला ५९ वा वाढदिवस साजरा केला. पण, यावेळी असे पहिल्यांदाच घडले की, तो त्याच्या मन्नत बंगल्याबाहेर फॅन्सना भेटण्यासाठी आला नाही. शाहरुख खान प्रत्येक वर्षाप्रमाणे आपल्या बर्थडेला बंगल्याबाहेर अभिवादन करण्यासाठी आणि फॅन्सचे आभार मानण्यासाठी आला नाही. दरम्यान, रिपोर्टनुसार, त्याने आपल्या फॅन्ससाठी एक गुडन्यूज देखील दिली. त्याने जाहिर केले की, आपल्या मुलांसाठी त्याने तब्बल ३० वर्षांनंतर सिगरेट ओढणे सोडले आहे. तुम्हाला माहितीये का, शाहरुख खानच्या आधी अनेक अभिनेते ज्यांनी स्मोकिंग करणे सोडले आहे.
शाहरुख खानने फॅन्स मिटिंगमध्ये म्हटलं की, त्याने स्मोकिंग करणे सोडून दिलं आहे. शाहरुखने सांगितले की, स्मोकिंगची इतकी वाईट सवय होती की, तो दिवसात १०० हून अधिक सिगरेट ओढायचा. वाढदिवसादिवशी मीट अँड ग्रीट कार्यक्रमात तो म्हणाला की, एक गुडन्यूज आहे की, मी आता स्मोकिंग करत नाही.' तो म्हणाला की, सिगरेट सोडल्यानंतर दम लागण्याची समस्या कमी होईल. शाहरुख खानला सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग केल्याबद्दल दंड देखील भरावा लागला आहे.
सलमान खान देखील चेन स्मोकर होता. पण २०१२ मध्ये सलमानने सिगरेट सोडली. रिपोर्टनुसार, सलमानने Trigeminal Neuralgia ट्रीटमेंटसाठी स्मोकिंग करणं सोडलं होतं.
आमिर खानला अनेकदा स्मोकिंग करताना पाहण्यात आलं होतं. हेल्दी लाईफस्टाईल आणि आपल्या मुलांसाठी आमिर खानने स्मोकिंग सोडलं होतं.
रणबीर कपूरला देखील स्मोकिंग करण्याची सवय होती. चित्रपट बर्फीच्या सेटवर अनुराग बसुने रणबीरला म्हटलं होतं की, तो सिगरेट पिणार नाही. त्याची मुलगी राहाच्या जन्मानंतर रणबीर कपूरने सिगरेट पिणं सोडलं आहे.
ऋतिक रोशनने सिगरेटला व्हायरस म्हटलं होतं. सोबतचं एलन कॅरीचे पुस्तक ईझी वेज टू स्टॉप स्मोकिंग विषयीदेखील खुलासा केला होता. ऋतिकने हे पुस्तक वाचल्यानंतर सिगरेट सोडली होती.
अजय देवगन चित्रपटातही आणि रियल लाईफमध्ये खूप सिरगेट ओढायचा. २०१८ मध्ये चित्रपट रेड दरम्यान त्याने सिगरेट ओढणे सोडले होते. शाहरुख खान प्रमाणे अजय देखील दिवसभरात १०० हून अधिक सिगरेट ओढायचा. पत्नी काजोल आणि मुलगी न्यासाच्या म्हणण्यानुसार तसेच सार्वजनिक ठिकाणी सिगरेट ओढल्याने दंड भरावा लागल्याने सिगरेट सोडली होती.