King's Tu Mil Jaaye  Pudhari photo
मनोरंजन

King's Tu Mil Jaaye song|'जवान'मधील 'जिंदा बंदा'ला मागे टाकत शाहरूखचे 'तू मिल जाये' गाणे चर्चेत, २४ तासात तब्बल ४१ मिलियन व्ह्यूव्ज

Shah Rukh Khan Tu Mil Jaaye song views| 'जवान'मधील 'जिंदा बंदा' गाण्याला मागे टाकत शाहरूखच्या 'तू मिल जाये' गाणे चर्चेत, २४ तासात तब्बल ४१ मिलियन व्ह्यूव्ज

स्वालिया न. शिकलगार

'किंग' चित्रपटातील 'तू मिल जाये' हे गाणे २४ तासांत ३६ दशलक्ष (३.६ कोटी) व्ह्यूजसह सर्वाधिक पाहिले जाणारे भारतीय चित्रपटातील गाणे ठरले आहे. या गाण्याने 'जवान'मधील 'जिंदा बंदा' आणि 'आदिपुरुष'मधील 'जय श्री राम' यांसारख्या गाण्यांना मागे टाकले आहे.

शाहरुख खानचा वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा झाला आहे. त्याचा आगामी 'किंग' चित्रपटातील पहिले गाणे 'तू मिल जाये' रिलीज झाले. किंग ऑफ रोमान्स शाहरुखच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त (२ नोव्हेंबर) ला प्रदर्शित झालेल्या या गाण्याने एका दिवसात तब्बल मिलियन व्ह्यूव्हज मिळवले आहेत.

दीपिका पदुकोण आणि शाहरुखच्या या रोमँटिक गाण्याने पहिल्या २४ तासांत विक्रमी व्ह्यूज मिळवले आहे. एका दिवसात सर्वाधिक पाहिले जाणारे भारतीय चित्रपटातील गाणे हे ठरले आहे. हे गाणे अवघ्या एका दिवसात सर्व प्लॅटफॉर्म्स मिळून ६० दशलक्षाहून अधिक वेळा हे गाणे पाहिले गेले आहे.

केवळ यूट्यूबवरच या गाण्याला ४१ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. तर ४,३०,००० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. याआधीचा विक्रम स्वतः शाहरुख खानच्याच नावावर होता. त्याच्या २०२३ मधील 'जवान' चित्रपटातील 'जिंदा बंदा' या गाण्याला पहिल्या २४ तासांत यूट्यूबवर ३४.६ दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकत्र

या गाण्यामुळे शाहरुख आणि दीपिका पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. जवाननंतर या गाण्याबद्दलच्या चर्चेचे मुख्य केंद्रबिंदू ते ठरले आहेत. अरिजित सिंग आणि मधुबंती बागची यांनी या रोमँटिक गाण्याला आवाज दिला आहे. सचिन-जिगर यांचे संगीत आहे. दीपिकाने 'ओम शांती ओम', 'हॅप्पी न्यू इयर', 'चेन्नई एक्सप्रेस', 'पठाण', 'जवान' या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

'किंग' विषयी जाणून घ्या

शाहरुख खानचा 'किंग' चित्रपट २४ डिसेंबर रोजी रिलीज होत आहे. २०२३ मध्ये 'डंकी'मध्ये शाहरुख दिसला होता. आता 'किंग'मधून शाहरुख एका वेगळ्या रुपात दिसणार आहेत.

हे असतील कलाकार

या चित्रपटात सुहाना खान, अभिषेक बच्चन, राघव जुयाल, जॅकी श्रॉफ, अर्शद वारसी, राणी मुखर्जी, करीना कपूर दिसणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT