पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता शाहरुख खान आणि त्याचा ‘मन्नत‘ बंगला कायमच लाईमलाईट मध्ये असतो. सि फेसिंग असलेल्या त्याच्या या बंगल्यासमोर चाहत्यांची नेहमीच गर्दी असते. मन्नत मधून त्याची एक झलक पाहण्यासाठी ‘फॅन’ तासन् - तास बंगल्याबाहेर उभे असतात. सेलिब्रिटींमध्येही या बंगल्याची क्रेझ दिसून येते. अनेक टिव्ही शोज मधूनही याचा उल्लेख आढळतो.
आता याची चर्चा होण्याचे कारण म्हणजे या बंगल्यासाठी शासनाने भाडेकरारातील जास्तिचे आलेले ९ कोटी परत देण्याचे ठरवले आहे. ज्यावेळी या बंगल्याचा भाडेकरार झाला त्यावेळी शाहरुखने लिज म्हणून जास्तिचे पैसे भरले होते. शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खान यांनी २०१९ मध्ये या ऐतिहासिक प्रॉपर्टी लिज मध्ये बदलून घेतली होती. महसूलमध्ये ही मालमत्ता ‘वर्ग एक मालकी हक्कात’ मोडते. ज्यावेळी शाहरुखने या प्रॉपर्टीचा भाडेकरार केला त्यावेळी शासनाकडे त्यांने अंदाजे २५ कोटी रुपये भरले होते. पण आता या भाडेकरारात शासनाला जास्तीची रक्कम भरली असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे ही रक्कम परत करण्यात येणार आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
निवासी उपनगरीय जिल्हाधिकारी सतिश बागल यांनी याला दूजोरा दिला आहे. ते म्हणाले की एकूण हप्ता भरलेल्या रकमेपैकी काही रक्कम जास्त आल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे महसूल विभागाने आता ही जास्तिची रक्कम खान दाम्पत्याला परत देण्याचे ठरवले आहे. या आठवभरात ही कार्यवाही केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील बांद्रा येथील बँडस्टंड परिसरात हा मन्नत बंगला आहे. शाहरुखने हा घेण्यापूर्वी याचे नाव ‘विला वियना’ असे होते. २००० साली शाहरुखने तो ९९ वर्षाच्या लिजवर घेतला व त्याचे नामकरण मन्नत असे केले. ६ मजली असलेली ही इमारत सि फेसिंग आहे. दोन मजल्यावर शाहरुख त्याच्या कुटूंबियासोबत राहतो तर बाकिच्या एरियात ऑफिसेस, पार्टी एरिया, पार्किंग आहे.