एका युजरने आर्यन त्याच्या पूर्ण सिनेमा कधी दिग्दर्शित करणार असे विचारले. हजरजबाबी शाहरुखने उत्तर दिले आहे की जर त्याला परवडेल आणि माझे नखरे सहन करू शकला तर.....
एकाने विचारले सर तुम्ही चार्टेड अकाऊंटंट असता तर बॅलेन्स शीट बॅलेन्स करण्यासाठी तुम्ही कोणती भूमिका घेतली असती? त्यावर शाहरुख म्हणतो मी अनिल कपूर साहेबांची 1, 2 का 4 ही स्टेप घेतली असती.
तुम्ही स्वप्न पाहणाऱ्या आणि ध्येयासाठी प्रयत्न करणाऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल असे एका युजरने विचारले असता शाहरुखने उत्तर दिले की स्वत:चे स्वप्न जगा. इतरांच्या स्वप्नाचा हिस्सा होऊ नका.