शाहरुख खान आगामी किंग चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. विशेष म्हणजे लेक सुहानासोबत या सिनेमात तो पहिल्यांदाच दिसणार आहे. या दरम्यान शाहरुखला दुखापत झाल्याची बातमीही समोर येत होती. पण आता शाहरुख पूर्णपणे बरा झाल्याचे समोर येत आहे. कारण शाहरुखचा सेटवर जाणारा फोटो लिक झाला आहे. यासोबतच या सिनेमातील त्याचा हटके लूकही लिक झाला आहे. (Latest Entertainment News)
गुरुवारी रेडिट या साईटवर शाहरुखचा सेटवरील फोटो व्हायरल होतो आहे. यामध्ये त्याची अगदी छोटी झलक दिसते आहे. या लुकमध्ये शाहरुख पांढरा शर्ट, केसांचा सॉल्ट अँड पेपर लूक आणि डोळ्यांवर उन्हापासून संरक्षण करणारा चश्मा या लूकमधील शाहरुखने चाहत्यांचे लक्ष वेधले नसले तर नवलच.
अर्थात इतके दिवस स्लिंगमध्ये असलेल्या शाहरुखच्या हाताबाबत मात्र कोणतीही अपडेट यातून मिळू शकलेली नाही. अर्थात त्याच्या आसपासची गर्दी ही सेटवर असते अशीच आहे. हा व्हीडियो व्हायरल होताच. एक फॅन म्हणतो, ‘या लूकमध्ये व्हाइट फॉक्स चांगला दिसतो आहे.’ एकजण म्हणतो, 'शाहरुख परत आला.’ काहीजणांनी या लूकची तुलना टॉम क्रुजच्या लूकशी केली आहे.
2027 मध्ये रिलीज होणाऱ्या किंगमध्ये अनेक कलाकारांचा भरणा आहे. या सिनेमात शर्वरी वाघ, दीपिका पदूकोण, अभिषेक बच्चन, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, सुहाना खान, राणी मुखर्जी, अर्शद वारसी आणि अभय वर्मा यांसारखे कलाकार दिसणार आहेत. सुहाना यात शाहरुखच्या विद्यार्थिनीचा रोल साकारते आहे.
सुजॉय घोष या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. तर सिद्धांत चतुरवेदि या सिनेमाची निर्मिती करत आहेत.