अभिनेता मोहनलाल यांच्या नेतृत्वाखालील असोसिएशनच्या सदस्यांनी राजीनामा दिला 
मनोरंजन

मोहनलाल यांच्या अध्यक्षतेखालील A.M.M.A समितीचा सामूहिक राजीनामा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - मल्याळम चित्रपट इंडस्ट्रीतील लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर अभिनेता मोहनलाल यांच्या अध्यक्षतेखालील A.M.M.A (मल्याळम मुव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन) ने सामूहिकरित्या राजीनामा दिला आहे. मोहनलाल यांच्यासह सर्व १७ कार्यकारी सदस्यांनी राजीनामा दिला आहे.

असोसिएशनने एका स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, सध्याचे प्रशासकीय पॅनलने आरोपांची नैतिक जबाबदारी घेत राजीनामे दिले आहेत. हा निर्णय हेमा कमिटीचा रिपोर्ट समोर आल्यानंतर घेण्यात आला आहे.

दोन महिन्याच्या आत बैठक बोलावणार

रिपोर्टनुसार, सभेची बैठक बोलावून दोन महिन्याच्या आत नव्या प्रशासकीय पॅनेलची निवडणूक घेतली जाईल.

काही दिवसांपूर्वी AMMA चे महासचिव, मल्याळम अभिनेते सिद्दीकी यांच्यावर एका मल्याळी अभिनेत्रीने गैरवर्तणुकीचा आरोप लावला होता. त्यानंतर सिद्दीकी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT