पुढारी ऑनलाईन डेस्क - गायिका सेलेना गोमेजने आपली अंगठी दाखवत नात्यात लवकरच बांधणार असल्याचे जाहीर केले आहे. तिने आपल्या लग्नाची घोषणा केली आहे. तिचा बॉयफ्रेंड बेनी ब्लँकोने तिला एंगेजमेंट रिंग घातली. तिने सोशल मीडियावर फोटोज शेअर केले आहेत. तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय -नेहमीसाठी आता सुरु झालं. (Selena Gomez)
सेलेना आणि बेनी ब्लँको एक वर्षाहून अधिक वेळ एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी १२ डिसेंबर २०२४ रोजी साखरपुड्याची घोषणा केली. सेलेनाने इन्स्टाग्रामवर एंगेजमेंट रिंग दाखवत पोस्ट शेअर केली आहे. (Selena Gomez)
सेलेना गोमेज-बेनी ब्लँकोच्या अफेअरची चर्चा २०२३ मध्ये झाली होती. दोघे नेहमी एकत्र स्पॉट व्हायचे. सेलेना ३२ वर्षांची तर बेनी ब्लँको ३६ वर्षांचा आहे.
सेलेनाने इन्स्टा पोस्ट शेअर करताच अभिनंदनाचा वर्षाव झाला. सेलेनाची मैत्रीण टेलर स्विफ्टने लिहिलं की ती लग्नात फ्लॉवर गर्ल असेल, जी वधूसोबत असते. जेनिफर एनिस्टन ते कार्डी बी पर्यंत तिने शुभेच्छा दिल्या आहेत.