'सावळ्याची जणू सावली'  Instagram
मनोरंजन

तारा- सोहमला एकत्र आण्यासाठीची मदत, सावली- सारंगच्या नात्यात दुरावा आणणार?

Savalyachi Janu Savali | तारा- सोहमला एकत्र आण्यासाठीची मदत, सावली- सारंगच्या नात्यात दुरावा आणणार?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत सावली सारंगसाठी व्रत ठेवण्याचा निर्णय घेते. ऐश्वर्या हे लक्षात आल्यावर संधीचा फायदा घेऊन सावलीला अपमानित करण्याचा आणि तिचा व्रत तोडण्याचा प्रयत्न करते. ती संपूर्ण कुटुंबासमोर सावलीला कमी लेखण्याचा प्रयत्न करत असतानाही, सावली ठाम आहे. दरम्यान, सारंग घरी परतताना त्याच्या सोबत एक लहानसा अपघात घडतो, ज्यामुळे सर्वजण चिंतेत आहेत. सावलीही त्याच्या मदतीसाठी धावत येते. सारंग सावलीच्या या काळजीने प्रभावित होऊन तिला तिला एका नव्या दृष्टीने पाहायला सुरुवात करतो. या सगळ्यात तिलोत्तमा सोहमसाठी मुलगी बघतेय, पण सोहमच तारा वर प्रेम आहे. तारा सावलीकडे हा साखरपुडा थांबवण्यासाठी मदत मागते. सावली साखरपुडा तोडण्यासाठी मार्ग शोधायला लागलेय. पण तिच्या या प्रयत्नांमुळे घरात तणाव निर्माण होतो आणि या सगळ्यामुळे सारंग आणि सावलीचा संबंधात पुन्हा एकदा अंतर येऊ लागलाय.

आता तारा सोहमला मदत करण्याच्या विचार सावली मागे घेईल की सारंगसोबतचं आपलं नातं सुधारेल? यासाठी 'सावळ्याची जणू सावली" रोज संध्या ७ वा. झी मराठीवर पाहा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT