'सावळ्याची जणू सावली' मालिकेत सारंगच्या आणि सावलीच्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे instagram
मनोरंजन

Savalyachi Janu Savali | सावली आणि सारंगच्या लग्नाची लगबग सुरु!

सारंगच्या संगीत समारंभात, सावली गाणार गाणं!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत सारंगच्या आणि सावलीच्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे. लग्नाच्या तयारीसाठी दोन्ही कुटुंब साडीच्या दुकानात जातात. साऱंग एक सुंदर साडी निवडतो, जी शेवटी सावलीपर्यंत पोहोचते. साऱंग आणि सावलीच्या कुटुंबांनी हळदीचा समारंभ आयोजित केला आहे. अलका गुपचूप साऱंगच्या हळदीला सावलीच्या हळदीसोबत बदलते, आणि ती उष्टी हळद सावलीपर्यंत पोहोचते. सावलीला हळद लागत असताना भैरवी अस्वस्थ आहे. आणि हळदीत गोंधळ घालण्याचा प्रयत्नात आहे. पण जगन्नाथ आणि अलका ही परिस्थिती हाताळतात. सवालीला हळदीत नटलेलं पाहून अलकाला तिच्या मुलीची आठवण येते, आणि ती भावुक होते.

जगन्नाथ तिचं सांत्वन करतो. साऱंगच्या घरी संगीत समारंभादरम्यान भैरवी सावलीला गाणं गाण्यासाठी आमंत्रित करते. परंतु, सावलीच्या घरी हळदी समारंभ सुरू असल्याने घरचे तिला गावाच्या हद्दीतून बाहेर जाण्यास मनाई करतात. तरीही, दिलेला शब्द पाळण्यासाठी सावली सर्व आव्हानं स्वीकारून साऱंगच्या घरी गाण्यासाठी जाते. आता लग्नाच्या आदल्या दिवशी, जगन्नाथ त्याचा अंतिम डाव उघड करणार आहे. तर इकडे सारंगच्या घरी लग्नाच्या पूर्वसंध्येला तिलोत्तमाला काही वाईट संकेत आणि अपशकुन असल्याचं जाणवतात.

नियतीने काय लिहलं आहे सारंग आणि सावलीच्या नशीबात? जगन्नाथने रचलेला कट यशस्वी होईल का? 'सावळ्याची जणू सावली' रोज संध्या ७ वा. झी मराठीवर पाहा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT