‘जब वी मेट’ चित्रपटातील छोट्या भूमिकेपासून ‘भाबीजी घर पे है’मधील अनीता भाभीपर्यंत सौम्या टंडनचा प्रवास हा मेहनत, संयम आणि सातत्याचा उत्तम नमुना आहे. अभिनयासोबतच अँकरिंग, लेखन आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या जोरावर तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
धुरंधरमध्ये अक्षय खन्नाच्या पत्नीची भूमिका साकारून सौम्या टंडन अधिक प्रसिद्धी झोतात आली. ती एक टीव्ही अभिनेत्री आणि चित्रपट अभिनेत्री आहे
भाबीजी घर पै हैमध्ये अनीता भाभी असो किंवा जब वी मेटमध्ये करीनाची बहिण रुप असो, प्रत्येक भूमिकेत ती परफेक्ट बसली
आता धुरंधरमधील छोटी भूमिका असेना मात्र तिने सर्वांचे लक्ष वेधले. सुंदर आणि प्रतिभावना असलेल्या सौम्याच्या या लोकप्रियतेमागे तिचा दीर्घ आणि संघर्षमय प्रवास दडलेला आहे.
सौम्या टंडनने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात चित्रपटसृष्टीतून केली. २००७ रोजी प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट ‘जब वी मेट’मध्ये तिने करीना कपूरच्या बहिणीची भूमिका तिने साकारली होती. भूमिका लहान असली, तरी तिचा सुसंस्कृत अभिनय प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. या चित्रपटामुळे तिला ओळख मिळाली, मात्र लगेच मोठ्या भूमिका मिळाल्या नाहीत.
अभिनयासोबतच सौम्याने टेलिव्हिजन अँकरिंगमध्येही आपले नशीब आजमावले. ‘डान्स इंडिया डान्स’सारख्या लोकप्रिय रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करत तिने स्वतःचा आत्मविश्वास आणि संवादकौशल्य सिद्ध केले. यामुळे ती केवळ अभिनेत्रीच नव्हे, तर उत्तम होस्ट म्हणूनही ओळखली जाऊ लागली.
खरा टर्निंग पॉइंट तिच्या करिअरमध्ये आला तो ‘भाबीजी घर पे है’ या विनोदी मालिकेमुळे. या मालिकेत तिने साकारलेली अनीता विभूती नारायण मिश्रा (अनीता भाभी) या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. तिची स्टायलिश प्रतिमा, सुसंस्कृत संवादफेक आणि कॉमिक टायमिंग यामुळे ही भूमिका लोकांना प्रचंड आवडली.
सौम्या टंडनने काही काळानंतर ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला, मात्र तरीही तिची अनीता भाभी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
दरम्यान, एका मुलाखतीत ती धुरंधरबद्दल म्हणाली, असं नाही की फक्त 'धुरंधर'मुळेच लोक मला अचानक ओळखत आहेत, 'भाजी घर पर हैं' या टीव्ही मालिकेतून मला प्रेक्षकांचे प्रेम मिळालं आहे
अक्षय खन्नाविषयी बोलताना ती म्हणाली, ''मला माहित होतं की, अक्षय इतका सीन चोरणारा कलाकार आहे. म्हणजे, तो खूप सूक्ष्म अभिनय करतो. त्याचं काम इतकं सखोल आहे की त्याच्या कामात अनेक स्तर आहेत. कॅमेऱ्यासमोर काय करायचे हे त्याला परफेक्ट माहिती असतं. खरं तर, तो या सगळ्याचा हक्कदार आहे.''
रणवीर सिंहबद्दल ती म्हणाली, ''मला या चित्रपटात रणवीर खूप आवडला. त्याने इतरांना संधी दिली, काही सीनमध्ये त्याचे फक्त मान खाली घालून मागे उभे राहणे, अशी दृश्ये आहेत. तो फक्त डोळ्यांनी अभिनय करतो.''