मनोरंजन

सौ. प्रताप मानसी सुपेकरचे १०० एपिसोड पूर्ण, कलाकारांनी असा केला जल्लोष

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेमारू मराठीबाणा वरील लोकप्रिय मालिका 'सौ. प्रताप मानसी सुपेकर' ने १०० भाग पूर्ण करुन एक उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. मालिकेच्या कलाकारांसाठी आणि संपूर्ण टीम साठी हा एक उत्साहाचा क्षण आहे. ह्या क्षणाचा आनंद साजरा करण्यासाठी कलाकार आणि संपूर्ण क्रू एकत्र जमले.

या मालिकेमध्ये मानसीची भूमिका साकारणारी अभिनेत्री तन्वी किरण आपला उत्साह व्यक्त करत म्हणाली, "अविस्मरणीय क्षण आणि मनापासून जोडलेल्या संबंधांनी भरलेला हा एक आनंददायी प्रवास आहे. आमच्या प्रेक्षकांचा अतूट पाठिंबा आणि त्याचबरोबर टीमचे समर्पण हि आमच्या यशामागील एक प्रेरक शक्ती आहे. हे १०० एपिसोड प्रेम, हास्य, आणि उत्स्फूर्त कामाचे आहेत."

प्रतापची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या प्रदीप घुलेने आपला आनंद व्यक्त केला, "'सौ. प्रताप मानसी सुपेकर' चा प्रवास हा माझ्यासाठी अप्रतिम प्रवास ठरला आहे. आम्ही हा आनंदमयी टप्पा साजरा करत असताना, शो मधील पात्रांना जिवंत करण्याची संधी दिल्याबद्दल मी कृतज्ञतेने भारावून गेलो आहे. हा टप्पा गाठणं हे कलाकार आणि क्रू मधील समन्वयामुळे शक्य झाले आहे आणि त्याचबरोबर ते पडद्यावर देखील प्रतिबिंबित होते. दर्शकांनी जे अतूट प्रेम आणि समर्थन दिले त्याबद्दल त्यांचे आभार."

या मालिकेने आपल्या आकर्षक कथानकाने उत्कृष्ट पात्रांनी आणि भावनिक वळणांच्या सुरेख संगमानी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मानसी कशाप्रकारे आव्हानांचा सामना करते आणि प्रतापसोबतचे तिचे नाते कशाप्रकारे अनपेक्षित वळण घेऊन त्यांच्या बंधनाची ताकद तपासली जाते हे पाहणं प्रेक्षकांसाठी खूपच मनोरंजक ठरेल. 'सौ. प्रताप मानसी सुपेकर' सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता पाहता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT