तितिक्षा तावडेने आपले अनुभव सांगितले  instagram
मनोरंजन

Satvya Mulichi Satavi Mulgi |तितिक्षा तावडेने सांगितला 'तो' किस्सा

"मला माझ्यात स्कंदमातेचे गुण दिसतात.."- नेत्राने सांगितला 'तो' किस्सा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - नवरात्रीच्या खास प्रसंगी 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेतील नेत्रा म्हणजेच तितिक्षा तावडेने सांगितले. कोणत्या देवीच्या रूपाचे गुण तिला तिच्यामध्ये दिसतात." मला ज्या देवींचे गुण माझ्यात दिसतात ती म्हणजे स्कंदमाता जिच्यामध्ये मातृत्वची शक्ती आहे. मला वाटतं की, माझ्यात ही आईची माया आणि सर्वांची काळजी घेणे असे गुण आहेत. दुसरी आहे ती माता सिद्धीदात्री जिच्यात अलौकिक शक्ती आहेत आणि मला वाटतं प्रत्येक स्त्री ही सिद्धीदात्री रूपाचा अंश आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये माता सिद्धीदात्रीची शक्ती आहे. मला कधीच वाटलं नव्हतं की, माझ्यातील स्त्रीशक्ती जागरूक होण्याची गरज आहे. कारण, मी खूपच सुरक्षित बॅकग्राऊंडमध्ये राहिली आहे. पण जेव्हा शाळेत जाऊ लागले विचित्र घटना घडू लागल्या, त्यात काही गोष्टी म्हणजे - रिक्षावाल्याने आरसा ॲडजस्ट करून बघणे आणि ते पाहून मग मी आपलं अंग चोरून बसणं, कॉलेजसाठी कधीतरी ट्रेनमध्ये जेन्ट्स डब्यामधून प्रवास करताना काही पुरुषचं बिनधास्त बघत राहणं आणि माझं त्या परिस्थितींना दुर्लक्ष करणं, कारण तेच हुशारीचा वागणं आहे असे वाटायचे. त्यांना राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी काही केले तर अशा गोष्टी तेव्हा सांगण्यात आल्या होत्या.

जेव्हा माझं मला कळायला लागले तेव्हा समजले की, अशा वागण्याने फक्त अशा पुरुषांची संख्या वाढेल. माझा ११ वी तील एक किस्सा आहे, जेव्हा मी परिवारसोबत ट्रेनमध्ये लांबचा प्रवास करत होते आणि तिथे एक माणूस मला त्या पूर्ण ८-९ तासांच्या प्रवासात सतत वाईट नजरेने बघत होता. तो पूर्ण प्रवास माझा टेन्शनमध्ये गेला. आमचं स्टेशन आलं आणि आम्ही बॅग काढत होतो, उतरायच्या तयारी करत होतो. पण, आता तो बिनधास्त नजर मिळवून बघत होता. हसत होता, इतका आत्मविश्वास वाढला त्याचा. तेव्हा माझा बांध तुटला आणि कुठून माझ्यात शक्ती आली आणि मी जोरात ओरडले त्याच्यावर, त्याआधी मी माझ्या परिवाराचं लक्ष वेधलं आणि त्यांना सर्व सांगितले.

हे सगळं पाहून तो लगेच घाबरला आणि दुसऱ्या बोगीत पळाला. तेव्हा मला कळले की, अशा व्यक्ती ही खूप घाबरतात पण आपण हिंमत दाखवून त्यांना थांबवले पाहिजे आणि मी या अनुभवानंतर ही गोष्ट लक्षात ठेवली आणि आजही मी त्यावर अंमल करते. फक्त स्वतःसाठी नाही तर दुसऱ्या स्त्रियांसाठी ही उभी राहते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT