Sharayu Date boyfriend proposed for marriage  instagram
मनोरंजन

Sharayu Date: सारेगमप लिटिल चॅम्प फेम शरयू दातेचं लग्न ठरलं, केनियात केलं प्रपोज; फोटो viral

Sharayu Date | सारेगमप लिटिल चॅम्प गायिका शरयू दातेचं शुभमंगल लवकरच? परदेशात बॉयफ्रेंडने गुडघ्यावर बसून केलं असं प्रपोज की...

स्वालिया न. शिकलगार

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' मधील लोकप्रिय गायिका शरयू दाते हिच्या घरात लवकरच सनई-चौघडे वाजणार आहेत. शरयूने तिचा दीर्घकाळाचा मित्र आणि बॉयफ्रेंडसोबतच्या नात्याची अधिकृत घोषणा केली आहे. विशालने परदेशात एका निसर्गरम्य ठिकाणी गुडघ्यावर बसून शरयूला लग्नासाठी विचारले. या 'सरप्राईज' प्रपोजलने शरयू भारावून गेली असून तिने हा आनंदाचा क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

आपल्या मधुर आवाजाने वेड लावणारी 'सारेगमप लिटिल चॅम्प' फेम गायिका शरयू दाते (Sharayu Date) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. शरयूने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील या सर्वात मोठ्या बातमीचा खुलासा केला असून, तिचे 'प्रपोजल' सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

ड्रीमी प्रपोजलची कथा

शरयू आणि तिचा बॉयफ्रेंडने परदेशात शरयूला सुखद धक्का दिला. हिरव्यागार निगर्सात त्याने गुडघ्यावर बसून शरयूला अंगठी दाखवत प्रपोज केले. शरयूसाठी हा क्षण अत्यंत भावूक होता. तिने या प्रपोजलचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने फोटोंना कॅप्शन लिहिली- (कथेतील अनपेक्षित वळण) शेवटी असं कळलं की, इथली सर्वात अविश्वसनीय गोष्ट म्हणजे लग्नाचा प्रस्ताव होता.

मीडिया रिपोर्टनुसार, शरयू दाते दक्षिण आफ्रिकेतील केनिया येथे गेले होती. पर्यटनाचे फोटो देखील इन्स्टाग्रामवर पाहायला मिळाले. केनियातील मसाईमारा राष्ट्रीय अभयारण्यातच शरयूला तिच्या बेस्ट फ्रेण्डने प्रपोज केल्याचं म्हटलं जात आहे.

शरयूनेच इन्स्टाग्रामवर ही आनंदाची वार्ता शेअर केलीय. तिच्या होणाऱ्या पतीचे नाव विभास वाटवे सांगण्यात येत आहे. या दोघांची प्रेमकहाणी कशी रंगली, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

शरयू दातेच्या गाजलेल्या गाण्यांमध्ये रंग माळियेला, आणि डॉ काशिनाय घाणेकर चित्रपटातील इंद्रधनु, क्षण हळवा अशा अनेक सुंदर गाण्यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT