मनोरंजन

सारा खानला स्वयंवरात हवेत ‘रणवीर सिंग, विजय देवरकोंडा, विकी कौशल’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या 'अतरंगी रे' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतेच ती यासाठी करण जोहरच्या शोमध्ये सहकलाकार धनुषसोबत सहभागी झाली होती. यावेळी बोलताना सारा म्हणाली की, 'मला स्वयंवर करायचे आहे. स्वयंवरात इतर कुणी असो नसो; पण चार पुरुष असले पाहिजेत. ते म्हणजे रणवीर सिंग, विजय देवरकोंडा, विकी कौशल आणि वरुण धवन.'

साराचे हे म्हणणे ऐकून करणला हसू आवरता आले नाही. तो म्हणाला, 'त्यांच्या पत्नी हा शो पाहत असतील.' त्यावर सारा म्हणाली की, 'मी लग्‍नासाठी तयार आहे; मात्र मला असा पती हवा आहे जो आई अमृतासोबत राहील. म्हणजेच त्याने घरजावई बनून राहावे.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT