मनोरंजन

sara ali khan : हे वागणं बरं नव्हं…सारावर भडकले नेटकरी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री सारा अली खान (sara ali khan) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. शीघ्र कवीप्रमाणे ती कविताही करत असते. वेगवेगळे प्रँकही करत असते. आताही अशाच एका प्रँकमुळे सारा (sara ali khan) नेटकर्‍यांच्या निशाण्यावर आली आहे आणि तिला ट्रोलिंगचाही सामोरे जावे लागले आहे. झाले असे की, साराने तिच्या एका स्पॉट गर्लसोबत मस्ती करताना तिला स्विमिंग पूलमध्ये ढकलून दिले होते. याचा व्हिडीओही तिने सोशल मीडियात पोस्ट केला आहे.

आस्क मी एनिथिंग या सेशनमध्ये तिने हा किस्सा सांगितला. अर्थात, त्यावर नेटकर्‍यांनी साराची चांगलीच 'हजेरी' घेतली आहे. ही चेष्टा नाही तर असंस्कृतपणा आहे. तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती, अशा शब्दांत तिला नेटकर्‍यांनी सुनावले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT