पुढारी ऑनलाईन डेस्क
मुंबईत कोरोनाने कहर केला आहे. यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींबरोबरच टीव्ही कलाकारांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. अलीकडेच विक्की कौशल, अक्षय कुमार, आलिया भट्ट, भूमि पेडणेकर, रुपाली गांगुली, कनिका मान यांच्यासह अनेक जण कोविड पॉझिटिव्ह झाले आहेत.
अधिक वाचा : मोठी बातमी : तोंडावर आलेल्या दहावी बारावी परीक्षेवर सरकारने केला खुलासा!
अशातच बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नुकतीच मुंबईतील एका जिमबाहेर स्पॉट झाली. तिने त्यावेळी मास्क घातला नव्हता आणि तेव्हा ती कारमधून उतरत होती. जेव्हा छायाचित्रकार तिची छबी क्लिक करण्यासाठी जवळ आले तेव्हा ती म्हणाली, 'माझ्या जवळ येऊ नकोस.'
'कुली नंबर 1' अभिनेत्री सारा अली खानने छायाचित्रकारांना जवळ न येण्याची विनंती केली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये सारा छायाचित्रकारांना जवळ येऊ नका म्हणून सांगत असल्याचे स्पष्ट दिसते. मास्कशिवाय सारा अली खानची छायाचित्रे व्हायरल झाल्यास ती ट्रोलर्सची शिकार झाली आहे.
सारा अली खानला बर्याच लोकांनी सल्ला दिला आहे. एका युझर्सने लिहिले की, हो ठिक आहे बहिणी मास्क घाल. दुसर्याने लिहिले की, आणि हे लो मास्क वापरण्याचे सल्ले देतात. सामाजिक अंतर कायम राखण्याचा सल्ला देतात. याशिवाय ते असेही म्हणतात की अनावश्यकपणे घराबाहेर जाऊ नका. एका युझर्सने लिहिले की 'दीदी मास्क कोठे आहे?
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सारा अली खान लवकरच अक्षय कुमार आणि धनुषसोबत 'अतरंगी रे' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. त्याचा ट्रेलर आणि रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यावर्षी डिसेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो, असे बोलले जात आहे.