मनोरंजन

साराने सुरू केली ‘गॅसलाईट’ची तयारी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

विकी कौशलसोबतच्या चित्रपटाचे चित्रीकरण संपवून सारा अली खान बंधू इब्राहिम अली खानसोबत काश्मिरला फिरायला गेली होती. आता तिथून परतून तिने तिच्या नव्या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. या आगामी चित्रपटाच्या कार्यशाळेलाही साराने हजेरी लावली होती.

हा चित्रपट आहे पवन कृपलानी दिग्दर्शित 'गॅसलाईट'. या चित्रपटात चित्रांगदा सिंह आणि विक्रांत मेस्सीही प्रमुख भूमिकेत आहेत. फेब्रुवारीच्या अखेरीस या चित्रपटाच्या चित्रीकरणास राजकोट येथे सुरुवात होऊ शकते. दरम्यान, साराच्या 'अतरंगी रे'मधील भूमिकेचेही कौतूक झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT