सारा अली खानने भिकाऱ्याला बिस्किट देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने नम्रतेने नाकारले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांनी तिला ट्रोल केले
Sara Ali Khan helps begger but he politely refuses
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. नुकतीच तिची एक छोटीशी मदतीची घटना व्हायरल झाली आहे. या घटनेनंतर नेटिझन्समध्ये जोरदार चर्चा तर रंगलीच शिवाय काहींनी तिला ट्रोल केले. नेमकं काय घडलं?
मुंबईतील बांद्रा येथील रस्त्यावर भर ट्रॅफिकमध्ये एक विकलांग भिकारी व्हील चेअरवरून साराच्या गाडी जवळ येतो. त्याला छोटीशी मदत करम्यासाठी साराने पर्समधून बिस्किटाचा पुडा काढते आणि दार उघडून त्याला द्यायचा प्रयत्न करते. पण भिकारी बिस्किट घेण्यास नकार देतो. तो नम्रतेने साराला म्हणतो की, मॅडम मी बिस्कीट खात नाही. यावर सारा काहीच बोलत नाही. ती बिस्कीट मागे घेते आणि कॅमेरा पर्सन्सना हातवारे करत थँक्यू म्हणून निरोप घेते. लगेच साराची गाडी तिथून रवाना होते.
हा सगळा घटनाक्रम कॅमेरामध्ये कैद होतो. बघता बघता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. इतकेच नाही तर काही नेटकऱ्यांनी साराला या व्हिडिओवरून ट्रोल करणे सुरु केले.
video -Bollywood Reporter
सारा अली खानच्या व्हिडिओवर ट्रोलिंगचा पाऊस
साराचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी तिला ट्रोल करणे सुरु केले. एका सोशल मीडिया युजरने लिहिले, १० रुपयांचे बिस्कीट भिकारी देखील घेत नाही आजकाल. आणखी एकाने म्हटले...'हातात बिस्कीट घेऊन पुन्हा चाललीय, दुसऱ्या कुणाला तरी देऊ शकली असती. आणखी एकाने म्हटलं- 'त्यांना वाटतं की, सायकल चालवणारा प्रत्येक व्यक्ती गरीब असतो. अगदी योग्य केलं. अशा लोकांसबोत असेच करायला हवं.'
तिसऱ्या युजरने लिहिलं- 'सोशल मीडियाच्या लाईमलाईटसाठी हे सर्व नाटक करतात.' आणखी काहींनी तिच्यावर टीका केलीय- 'या सायकलवाल्याला बिस्किटचा पुडा का देत होती.' 'लाखोंचे इन्कम ठेवून २० रुपयांचे बिस्किट देऊन मोठं काम करत आहे.'
सारा अली खानचे आगामी प्रोजेक्ट
सारा अली खान यावर्षी 'स्कायफोर्स', 'मेट्रो इन दिनों' या दोन चित्रपटात दिसली होती. आता ती ४ मार्च, २०२६ मध्ये 'पती पत्नी और वो २' मध्ये दिसेल. त्याचबरोबर 'वन- फोर्स ऑफ द फॉरेस्ट' मे, २०२२६ मध्ये रिलीज होण्यास सज्ज आहे.