sanya malhotra  
मनोरंजन

Sanya Malhotra चा ‘ मिसेस’ चित्रपट पोहोचला हवाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सान्या मल्होत्राचा आगामी चित्रपट 'मिसेस' २०२४ च्या हवाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (HIFF) प्रदर्शित करण्यात येणार आहे. (Sanya Malhotra) सान्या या चित्रपटात एक वेगळी भूमिका साकारणार असून संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानाची बाब आहे. (Sanya Malhotra)

लेखिका चित्रपट निर्मात्या आरती कडव दिग्दर्शित, 'मिसेस', जो मल्याळम चित्रपट 'द ग्रेट इंडियन किचन' चा रिमेक आहे. सान्या मल्होत्राने एक पात्र साकारले आहे जे प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आहे यात शंका नाही. हवाई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या लाइनअपमध्ये "मिसेस" चा समावेश असणं हे नक्कीच खास आहे. यापूर्वी हा चित्रपट पाम स्प्रिंग्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही गेला होता. सान्या मल्होत्राचा उत्कृष्ट अभिनय, चित्रपटाच्या वेधक कथाकथन हा चित्रपट खास ठरतोय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT