मोनालिसाला चित्रपटाची ऑफर देणाऱ्या दिग्दर्शकाला अटक File Photo
मनोरंजन

'महाकुंभ'मधील मोनालिसाला चित्रपटाची ऑफर देणाऱ्या दिग्दर्शकाला अटक

Sanoj Mishra | बलात्कार प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने जामीन फेटाळला

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: 'महाकुंभ २०२५' ची व्हायरल गर्ल मोनालिसा हिला चित्रपटाची ऑफर देणारे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांना बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या संदर्भातील वृत्त 'ANI'ने दिले आहे.

पीडित महिलेचे दिग्दर्शक मिश्रांवर गंभीर आरोप

४५ वर्षीय सनोज मिश्रा यांना ३० मार्च २०२४ रोजी दिल्ली पोलिसांनी गुप्तचर माहिती गोळा केल्यानंतर आणि तांत्रिक देखरेखीनंतर अटक केली. ही अटक गाझियाबादमध्ये झाली, त्यानंतर सनोज मिश्रा यांना नबी करीम पोलिस ठाण्यात ताब्यात घेण्यात आले. २८ वर्षीय महिलेने दिग्दर्शकावर आरोप केला आहे की, "सनोज यांनी तिच्यावर चार वर्षे बलात्कार केला. चित्रपट अभिनेत्री बनण्याची आकांक्षा असलेल्या महिलेने दावा केला की, ती या काळात मुंबईत मिश्रासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. मिश्राने तिला तीनदा गर्भपात करण्यास भाग पाडले, असा आरोप देखील संबंधित महिलेने दिग्दर्शकावर केला आहे.

दिग्दर्शकावर बलात्कारासह 'हे' गंभीर आरोप

पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात सनोज मिश्रावर लग्नाचे वचन न पाळल्याचा आरोपही केला आहे. दिल्ली पोलिसांच्या निवेदनानुसार, ६ मार्च २०२४ रोजी बलात्कार, हल्ला, गर्भपात करण्यास भाग पाडणे आणि धमक्या देणे यासारख्या अनेक कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

'या' घटनेनंतर पीडितेची पोलिसांत तक्रार

ज्या घटनेत तक्रार दाखल करण्यात आली ती १८ फेब्रुवारी २०२५ रोजी घडली होती. जेव्हा आरोपीने पीडितेला नबी करीम येथील हॉटेल शिवामध्ये आणले होते. या प्रवासादरम्यान दिग्दर्शक सनोज मिश्रा यांच्यावर महिलेशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आणि नंतर तिला सोडून दिल्याचा आरोप आहे. यानंतर पीडितेने तक्रार दाखल केली. दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणात मिश्राचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

व्हायरल मोनालिसाला दिली होती चित्रपट ऑफर

'महाकुंभ २०२५' दरम्यान व्हायरल झालेल्या मोनालिसाला सनोज मिश्रा यांनी त्यांचा चित्रपट ऑफर केला. या घोषणेनंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला. दिग्दर्शकाविरुद्धचे पूर्वीचे आरोपही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हायलाइट झाले आणि त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT