प्रत्येकाला हा पैसा स्वतःच्या तर कुणाला आपल्या जवळच्या माणसांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हव्यासापोटी हवा असतो... अशी पैशाच्या भोवती फिरणारी येरे येरे पैसा -३ ची कथा आहे.
अनुपमा गुंडे
दाम करी काम, पैशाची जादू लई न्यारी या दामाच्या अर्थात दाय पैशाभोवती दुनिया फिरत जगण्याला पैसा लागतो. पण अनेकांना हा पैसा कष्टानं आणि मेहनतीने कमवण्याची इच्छा नसते त्यामुळे सहज विनासायास हाताशी आलेला सोन्याच्या बिस्किटांचा खजिना. हा खजिना जपतांना झालेली पुरेवाट आणि पुन्हा खजिना निष्काळजीपणाने हरवल्यानंतर मुळ चोराला तो परत करण्यासाठी निर्माण झालेली हव्यासी लोकांची साखळी. प्रत्येकाला हा पैसा स्वतःच्या तर कुणाला आपल्या जवळच्या माणसांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हव्यासापोटी हवा असतो. अशी पैशाच्या भोवती फिरणारी येरे येरे पैसा - ३ ची कथा आहे.
येरे येरे पैसा ची सिक्कल कथा प्रेक्षकांनी यापूर्वी दोन भागात पाहिली आहे. या दोन भागांना मिळालेल्या प्रतिसादामुळे तिसऱ्या भागाचे धाडस निमति आणि दिग्दर्शकांनी केले असली तरी हा तिसरा पैसा प्रेक्षकांच्या मनाची पकड घेण्यात तितकासा यशस्वी ठरला नाही. संजय नार्वेकर (अण्णा) लग्नाच्या १२ व्या वाढदिवसांची आठवण करून देणारा मेहूणा प्रद्युम्न (आनंद इंगळे) हे दोघे जण एकमेकांची मस्करी करत असताना तिथे एका तस्काराकडे माशांमध्ये लपवून सोन्याची बिस्किट पोहचवणारी कोळीणीच्या वेशात येणारी (मीरा जगन्नाथ) तिच्या बॉसने सांगितलेल्या सांकेतिक भाषेत अण्णाही योगायोगाने तिच्याशी संवाद साधतो.
सोन्याची बिस्किट घेणारा हाच तोच माणूस असं समजून ती अण्णाकडे बिस्किट सोपवते. अण्णालाही या माशांमध्ये लपलेला खजिना माहिती नसतो, मात्र तपासणी नाक्यावर माशांची टोपली टॅक्सीत पलटी झाल्यावर माशांतून बाहेर पडलेली बिस्किट पाहून अण्णाचे डोळे विस्फरतात. तिथून चित्रपटाच्या कथेला वेग येतो. मग आपल्याला हवे ते साध्य करण्यासाठी, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी इन्सपेक्टर राणे, बबली, अदित्य हे या पैशाच्या खेळात नकळत ओढली जातात. राजकारणी वाडेकर यांची मुलगी इशा (वनिता खरात) या पैशाच्या दुनियेपासून अलिप्त असते. सनीवर खरं प्रेम करणाऱ्या ईशाच्या हातात हा सोन्याच्या बिस्किटाचा खजिना पडतो. आणि तिथेच चित्रपटाचा पडदा पडतो. मेहनत, विश्वास याशिवाय मिळालेले प्रेम असो की पैसा टिकत नाही. असा संदेश चित्रपट देतो.
पण कथासूत्र खूपच गोलगोल पध्दतीने पडद्यावर सादर झाल्याने आणि माध्यम चित्रपटाचे असलं तरी तर्काला न पटणाऱ्या अनेक गोष्टी कथेच्या ओघात आल्या तरी त्या मनावर पैशाइतकी जादू करत नाही. कॉमेडी, ड्रामाने भरलेल्या या कथेत सगळ्याच कलाकारांनी अभिनयात बाजी मारली असली तरी कथा आणि दिग्दर्शनाचा टिपिकल फॉरमॅट प्रेक्षकांच्या पचनी पडत नाही.
बॅनरः अमेय विनोद खोपकर फिल्मस, उदाहरणार्थ निर्मित अॅन्ड न्युक्लियर अॅरो पिक्चर्स
को- प्रोड्युसः वार्ड विझर्ड एन्टरटेंनमेंट
लेखक आणि दिग्दर्शक : संजय जाधव
प्रेझेंट बायः करण जोहर, अदर पुनावाला, अपूर्वा मेहता
निर्मातेः सुधीर कोलते, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, अमेय खोपकर, ओम प्रकाश भट्ट, नासीर शरीफ, निनाद बत्तीन, गिरीधर धुमाळ
कलाकार : संजय नार्वेकर (अण्णा), सिध्दार्थ जाधव (सनी), उमेश कामत (आदित्य), तेजस्विनी पंडित (बबली), विशाखा सुभेदार (रंजना) आनंद इंगळे (प्रद्युम्न), नागेश भोसले (इन्सपेक्टर राणे), इशा (वनिता खरात) जयवंत वाडेकर, मीरा जगन्नाथ, बिजॉय आनंद.
स्क्रीन प्ले: सुजय जाधव, संवाद अरविंद जगताप
संगीत : अमीत राज म्युझिक, पकंज पडघन गीतकारः डॉ. विनायक पवार, सचिन पाठक,
कोरियोग्राफर : उमेश जाधव
गायक : अमृतराज, वैशाली सामंत, आदर्श शिंदे, बेला शेंडे, सायली पकंज, रवींद्र खोमणे, राधा खुडे, मुनावर अली, अपूर्वा निषाद, सावनी भट्ट