संग्राम चौगुलेची बिग बॉस मराठीमध्ये एन्ट्री  Pudhari Photo
मनोरंजन

Big Boss Marathi : 'बिग बॉस'च्या घरात संग्राम चौगुलेची वाईल्ड कार्ड एन्ट्री

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘बिग बॉस मराठी’ चा हा नवा सिझन चांगलाच गाजत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. नुकतंच कालच्या भागामध्ये एक एलिमिनेशन झाल. घरातील छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडेचा या घरातील प्रवास संपला आहे. मात्र त्यानंतर आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात होणार सीझनची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. कोल्हापूरचा 'रांगडा गडी' बॉडी बिल्डर संग्राम चौगुले याच्या रुपामध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. आता संग्राम त्याच्या खेळीमुळे घरामध्ये त्याची जागा कशी निर्माण करतो याची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

दुसऱ्या आठवड्यापासूनच या सीझनमध्ये कोण वाईल्ड कार्ड सदस्य सहभागी होणार याकडे बिग बॉसप्रेमींचं लक्ष लागलं होतं. वाईल्ड कार्ड सदस्याबद्दल अनेक नावे समोर आली होती. आता या संग्रामच्या आगमनाने सर्व प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. मागील चार दिवसांपासून ‘बिग बॉस मराठी’चा प्रोमो सर्वांनाच विचार करायला भाग पाडणारा होता. प्रोमोमध्ये, तो आहे मर्द रांगडा आणि मनाचा राजा…अस्सल फौलाद घालणार ‘बिग बॉस’च्या घरात राडा, असं म्हटलं गेलं आहे. त्यामुळे अरबाज, वैभवला टक्कर देणारा हा नवा सदस्य आला आहे. त्यामुळे घरामध्ये तर खळबळ उडाली आहेच. मात्र आता संग्रामच्या एन्ट्रीने प्रेक्षकांनासुद्धा शोमध्ये पुढे काय होणार याच्याकडे लक्ष लागून आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT