नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
सना खान सिनेइंडस्ट्री सोडली आणि संसारात रमली. लग्नानंतर ती अनेकवेळा चर्चेत राहिली आहे. सनाने गुजरातचे मुफ्ती अनस सैयद यांच्यासोबत २० नोव्हेंबरला निकाह (लग्न) लग्नाचे काही फोटोजदेखील तिने सोशल मीडियावर शेअर केले. दरम्यान, हनीमूनसाठी काश्मीर गेल्यानंतरदेखील तिने आपले फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते. तिचे अनेक रोमँटिक फोटोज पाहायला मिळाले होते. आता सनाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सना खान बॉलिवूड सोडण्यामागे काय कारण होते, याबद्दल ती सांगताना दिसत आहे.
बिग बॉस ६ फेम सना खानने ऑक्टोबरमध्ये चित्रपट इंडस्ट्री सोडण्याची घोषणा केली होती. तिने 'जय हो', 'हल्ला बोल', 'वजह तुम हो' आणि 'टॉयलेटःएक प्रेम कथा' यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. तिने मानवतेच्या सेवेसाठी मायानगरी सोडली आणि २० नोव्हेंबरला सूरत येथे राहणारे बिजनेसमॅन मौलाना अनस सैयद यांच्याशी विवाह केला. नंतर आपले नावही बदलून सैयद सना खान असं ठेवलं आहे.
सना खानने आपल्या लग्नाविषयी एका बॉलिवूड वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, 'आम्ही २०१७ मध्ये पहिल्यांदा मक्का येथे भेटलो होतो. भारतात परतताना ही खूप छोटी भेट होती. अनस इस्लामिक स्कॉलर होते. मला त्यांचे बोलणे आवडले. मी २०१८ मध्ये त्यांच्याशी शेवटचे बोलणे केले आणि धर्माशी संबंधित अनेक प्रश्न उपस्थित केले होते.'
लग्नाचा निर्णय एका रात्रीत झालं नाही
सना खानने लग्नाच्या निर्णयाबाबत म्हटले की,"आम्ही २०२० मध्ये पुन्हा संपर्कात आलो. मला नेहमी इस्लामविषयी जाणून घ्यायचं होतं." अनस यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय मी एका रात्रीत घेतला नाही. यासारखी व्यक्ती भेटण्यासाठी मी जीवनात अनेक वर्षांपर्यंत प्रार्थना केली होती. माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट म्हणजे ते खूपच नम्र आहेत."
अनस यांच्या बोलण्याचा खूपच प्रभाव पडल्याचेही तिने सांगितलं.