पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री समीरा रेड्डीने आपल्या करिअर सुरुवातीच्या अनुभवांबद्दल सांगितले. तिला सुरुवातीला कोणकोणता दबाव झेलावा लागला होता? याबद्दल सांगितले. 'मुसाफिर', 'रेस', 'मैंने दिल तुझको दिया' यासारख्या चित्रपटांतून दिसलेली समीरा रेड्डी दीर्घकाळ ऑन-स्क्रीनवर दिसली नाही. पण, ती सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह आहे. समीराला आपले पांढरे केस अथवा ॲक्चुअल बॉडी टाईप दाखवण्यात कोणतीही चिंता नाही.
एका मुलाखतीत तिने म्हटलं की, "माझ्या करिअरच्या सुरुवातीला बूब जॉब (ब्रेस्ट सर्जरी) करण्याचा खूप दबाव टाकण्यात आला होता. खूप लोक म्हणाले, 'समीरा, सर्वजण म्हणत आहेत तर का करत नाहीस?' पण मला आतून काही चांगलं वाटत नव्हतं."
अधिक वाचा-
समीरा पुढे म्हणते, "हा असा प्रसंग आहे, जसे तुम्ही तुमचा कोणता तरी दोष लपवत आहात. पण, कोणताही दोष नाही, आयुष्य असेच असते. मी कोणत्याही अशा व्यक्तीला जज करणार नाही, जो प्लास्टिक सर्जरी आणि बोटोक्स करू इच्छित असेल. पण जी गोष्ट मला माझ्यासाठी करायची आहे, ती मी अंतर्मनातून करते."
अभिनेत्री समीरा म्हणते, "लोकांनी म्हटलं की, आता मी आपल्या त्वचेबद्दल खूप खुश आहे. मी अधिक कम्फर्टेबल दिसते. जेव्हा मी 40 वर्षांची होते. तेव्हा इंटरनेटवर माझे वय ३८ दाखवL होते. मी लगेच बदललं आणि ४० केलं.
अधिक वाचा-
समीरा पुढे म्हणते, "माझ्यात वयाच्या ४५ शीतही अमेजिंग दिसण्याची क्षमता आहे. जेव्हा तुम्ही पांढरे केस, आपल्या पोटाची चरबी आणि स्ट्रेच मार्क्स दाखवता, तर 'माझ्यासारखं कुणी दुसरेदेखील आहे', असा विचार केल्यानंतर तुमच्यावरील दबाव कमी होतो."
अधिक वाचा-