Samay Raina NEET Pudhari
मनोरंजन

Samay Raina NEET: 'पेपर लीक झालेत!' समय रैनाच्या एका वाक्याने सोशल मीडियावर उडाली खळबळ, व्हिडिओ व्हायरल

Samay Raina NEET: 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या दुसऱ्या सीझनमध्ये समय रैनाने एका मेडिकल विद्यार्थिनीशी संवाद साधताना NEET पेपर लीक प्रकरणावर अप्रत्यक्षपणे विनोदी टोला लगावला.

पुढारी वृत्तसेवा

Samay Raina NEET: कॉमेडियन आणि यूट्यूबर समय रैना पुन्हा एकदा आपल्या भन्नाट शैलीमुळे चर्चेत आला आहे. त्याच्या लोकप्रिय 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोच्या दुसऱ्या सीझनमधील एका एपिसोडमध्ये त्याने NEET पेपर लीक प्रकरणावर अप्रत्यक्षपणे टोला लगावला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी त्याच्या विनोदबुद्धीचे कौतुक केले आहे.

या एपिसोडमध्ये हर्ष लिंबाचिया, कीकू शारदा आणि चंदन प्रभाकर हे विशेष पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. यावेळी जेनी नावाच्या एका मेडिकल विद्यार्थिनीने आपल्या गायनाची कला सादर केली. परफॉर्मन्सनंतर तिने आपण होमिओपॅथीचे शिक्षण घेत असल्याचे सांगितले. तसेच, कमी उपस्थितीमुळे दुसऱ्याच दिवशी कॉलेजसाठी परत जावे लागणार असल्याचेही ती म्हणाली.

यावर समय रैनाने नेहमीच्या मिश्किल शैलीत तिला विचारले, "तू होमिओपॅथीऐवजी खरी डॉक्टर का होत नाहीस?" त्यानंतर तो म्हणाला, "आता तर पेपरही लीक झालेत!" या एका वाक्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्याचा हा विनोद NEET पेपर लीक वादावर अप्रत्यक्ष भाष्य असल्याचे मानले जात आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक नेटकरी समय रैनाचे कौतुक करत आहेत. काहींनी महत्त्वाच्या विषयावर विनोदी शैलीत भाष्य करण्याचे धाडस दाखवल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले, तर काहींनी त्याच्या विनोदाचे समर्थन केले.

दरम्यान, 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या पहिल्या सीझननंतर झालेल्या वादांनंतर समय रैनाने दुसऱ्या सीझनद्वारे दमदार पुनरागमन केले आहे. या सीझनला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून प्रत्येक भाग सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT