पुढारी ऑनलाईन डेस्क - वेब सिरीज 'सिटाडेल: हनी बनी'ची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. वरुण धवन आणि सामंथा रुथ प्रभू यांची नवी स्पाय सीरीज निर्मात्यांनी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर रिलीज केली आहे. या सीरीजमधील सामंथा आणि वरुणचा किसिंग सीन आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
सिटाडेलमध्ये सामंथा-वरूण किसिंग सीन: बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आणि दक्षिण फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू यांची नवीन स्पाय वेब सीरीज 'सिटाडेल: हनी बनी' आहे. ती आज ७ नोव्हेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे. निर्मात्यांनी ही सीरीज Amazon Prime Video वर रिलीज केली आहे. या सीरीजमधील सामंथा रुथ प्रभू आणि वरुण धवन यांचा एक सीन इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
'सिटाडेल: हनी बनी' मधून व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सामंथा रुथ प्रभू आणि वरुण धवन चुंबन घेताना दिसत आहेत. दोघांच्या या किसिंग सीनने इंटरनेट धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडिओ लोक पुन्हा पुन्हा पाहत आहेत. कॉमेंट करताना एका युजरने लिहिले की, 'सामंथा आणि वरुणची केमिस्ट्री अप्रतिम आहे.' तर दुसऱ्याने लिहिले की, 'वरूण आणि समंथाच्या किसिंग सीनने आग लावली आहे.' या दोन्ही कलाकारांच्या अभिनयाचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.
वरुण धवन आणि समंथा रुथ प्रभू यांची मुख्य भूमिका असलेली 'सिटाडेल: हनी बनी' ही गुप्तचर मालिका राज आणि डीके या दिग्दर्शक जोडीने दिग्दर्शित केली आहे. या सीरीजमध्ये वरुण आणि सामंथाचे अनेक अप्रतिम ॲक्शन सीन्स आहेत, जे लोकांना खूप आवडत आहेत. विशेष म्हणजे या मालिकेत वरुण आणि सामंथा यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केले असून ही जोडी लोकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरली आहे.