Samantha Ruth Prabhu confirm her pregnancy  Instagram
मनोरंजन

Samantha Ruth Prabhu | पहिल्या अपत्याची चाहूल! अभिनयातून काही काळ विश्रांती, सामंथाच्या मॅटर्निटी ब्रेकची चर्चा

Samantha Ruth Prabhu | पहिल्या बाळाच्या स्वागताची तयारी, सामंथा रुथ प्रभूने घेणार मॅटर्निटी ब्रेक

स्वालिया न. शिकलगार

लोकप्रिय अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूबाबत मॅटर्निटी ब्रेक घेणार असल्याच्या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात असले तरी यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता कायम असून, सामंथाकडून किंवा तिच्या टीमकडून अधिकृत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा केली जात आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू हिने तिची प्रेग्नेन्सी कन्फर्म केली. बुधवारी हैदराबादमध्ये तिच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या Maa Inti Bangaaram या चित्रपटाच्या यशाबाबत एक मोठी घोषणा केली. चित्रपटाच्या यशानंतर अवघ्या काही दिवसांतच तिने आपल्या मॅटर्निटीबद्दल सांगितले. पती राज निदिमोरु आणि सामंथाच्या घरी पहिल्या बाळाची चाहुल आहे. त्यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या तिच्या प्रेग्नेन्सी बाबतच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. तसेच, लवकरच प्रसूती रजा घेणार असल्याचेही तिने स्पष्ट केले.

माध्यमांशी बोलताना सामंथाने सांगितले की, सध्या सुरू असलेली व्यावसायिक कामे पूर्ण केल्यानंतर ती काही काळ अभिनयापासून दूर राहणार आहे. “'मा इंटी बंगारम'नंतर माझ्या प्रकृतीनुसार मला थोडा विराम घ्यावा लागेल. मी प्रसूती रजेवर जाणार आहे. त्यानंतर पुन्हा नव्या चित्रपटासह प्रेक्षकांसमोर येईन.”

या घोषणेनंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात तिचे अभिनंदन केले. सामंथाने सर्वांच्या शुभेच्छांसाठी आभार मानत चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तिच्या शेजारी बसलेले राज निदिमोरूही ही बातमी सांगताना आनंदाने हसताना दिसले.

काही दिवसांपूर्वी 'मा इंटी बंगारम'च्या समारंभातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सामंथा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा रंगली होती. त्या क्लिप्समध्ये तिचा बेबी बंप दिसत होता. यापूर्वी चित्रपटाच्या दिग्दर्शिका बी व्ही नंदिनी रेड्डी यांनीही सामंथाच्या प्रेग्नेंसीबाबत भाष्य केले होते. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “आमचा चित्रपट यशस्वी ठरत असतानाच सामंथाच्या आयुष्यात आलेली ही आनंदाची बातमी अतिशय सुंदर वेळेत आली आहे.”

सामंथाने २०१७ मध्ये अभिनेता नागा चैतन्यशी विवाह केला होता. मात्र २०२१ मध्ये दोघे वेगळे झाले. त्यानंतर सामंथाने राज निदिमोरूसोबत १ डिसेंबर २०२५ रोजी इशा योगा सेंटर येथे विवाह केला.

'मा इंटी बंगारम'च्या सक्सेस मीटमध्ये माध्यमांशी बोलताना तिने सांगितले की, तिचे सध्याचे प्रोजेक्ट्स पूर्ण झाल्यावर ती मॅटर्निटी ब्रेक घेणार आहे. ती म्हणाली, 'मा इंटी बंगारम'नंतर, माझी प्रकृती पाहता मला थोडा ब्रेक घ्यावा लागेल. मला मॅटर्निटी लिव्ह घ्यावी लागेल. त्यानंतर मी माझ्या चाहत्यांसाठी दुसऱ्या चित्रपटासह परत येईन.'

'मा इंटी बंगारम'च्या सक्सेस सेलिब्रेशनमधील व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांनंतर तिने ही घोषणा केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT