पुढारी ऑनलाईन डेस्क - सामंथा रुथ प्रभूचे वडील जोसेफ प्रभू यांचे शुक्रवारी दि. २९ रोजी निधन झाले. अभिनेत्री सामंथाने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
सामंथाने इन्स्टाग्राम स्टोरीवर ब्रोकन हार्ट इमोजी शेअर करत पोस्ट लिहिली आहे-“जोपर्यंत आपण पुन्हा भेटत नाही डॅड.”
सामंथाने एका बातचीतमध्ये सांगितले होते की, तिचे वडील जोसेफ प्रभू यांच्यासोबत तिचे तणावपूर्ण नाते होते. तिने सांगितले होते की, कशाप्रकारे या तणावाने तिच्या जीवनावर प्रभाव टाकला आहे. सामंथाने म्हटले होते की, जीवनात प्रगती इतकया सहजपणे मिळाली नाही. यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला.