मनोरंजन

‘सलमान सोसायटी’ येतोय भेटीला, ‘पार्टी दणाणली’ हे गाणं ऐकलं का?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'सलमान सोसायटी' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील एक सॉन्ग आज लॉन्च करण्यात आले असून 'पार्टी दणाणली…' असे या गाण्याचे बोल आहेत. पुष्कर लोणारकर, गौरव मोरे, शुभम मोरे आणि विनायक पोतदार यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले.

संबंधित बातम्या –

'सलमान सोसायटी' चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार व निर्मिती रेखा सुरेंद्र जगताप , शांताराम खंडू भोंडवे व वैशाली सुरेश चव्हाण प्राजक्ता एंटरप्रायजेसच्या बॅनर अंतर्गत करत आहेत. 'सलमान सोसायटी' हा चित्रपट शिक्षणावर भाष्य करतो. भारत देश साक्षर होईल, तेव्हा भारताचा विकास होईल या टॅगलाईनवर आधारीत आहे. 'पार्टी दणाणली' हे गाणे श्रेयस आंगणेने संगीतबद्ध केले आहे आणि नागेश मोरवेकरने गायले आहे.

अमित बाईंगने कोरिओग्राफ केले आहे. या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित करणारा गौरव मोरे एका वेगळ्या पण महत्वपूर्ण भूमिकेत दिसेल. तसेच पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार ही बच्चे कंपनी मुख्य भूमिकेत असणार आहेत.
बालकलाकार पुष्करने या आधी 'एलिझाबेथ एकादशी', 'बाजी', 'रांजण', 'चि .व चि .सौ. का', 'फिरकी' आणि 'टी. टी. एम. एम' झोंबीवली चित्रपटात अभिनय केला आहे तर शुभम मोरेने हिंदी चित्रपट 'रईस'मध्ये बालपणीच्या शाहरुख खानची भूमिका बजावली. तसेच 'हाफ तिकिट', 'फास्टर फेणे' जर्नी सारखे उत्तम मराठी चित्रपट केलेत तर बालकलाकार विनायक पोतदार याने 'हाफ टिकिट', 'ताजमहल' आणि 'येरे येरे पावसा, माउली'मध्ये भूमिका केल्या आहेत.

चित्रपटामध्ये उपेंद्र लिमये पाहुणा भूमिकेत आहे. तसेच चित्रपटामध्ये देवकी भोंडवे, वनिता खरात, नम्रता संभेराव, कुणाल मेश्राम, शेषपाल गणवीर आदि कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

सलमान सोसायटी १७ नोव्हेंबर २०२३ ला सर्व चित्रपटग्रहात प्रदर्शित होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT