सलमान खानने घेतले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन Eknath Shinde 'x' Handle
मनोरंजन

Salman Khan : सलमान खान पोहचला मुख्यमंत्री शिंदेंच्या घरी गणेश दर्शनाला

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सलमान खानने आज (दि.15) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील 'वर्षा' निवासस्थानी भेट देवून गणरायांचे दर्शन घेतले. यावेळी त्याच्यासोबत बहीण अर्पिताही उपस्थित होती. सलमान खान याच्या गणेश दर्शनाचे फोटो मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या X अकाउंटवर पोस्ट केले आहेत.

मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये सलमान खान गणेशमूर्तीसमोर हात जोडून प्रार्थना करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोंमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलमान खानचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

सलमानच्या घरीही बाप्पाचे आगमन

बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात लाडक्या गणरायाचे आगमन झाले. सलमान गणपती बाप्पाच्या अर्चनेमध्ये तल्लिन असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. सलमान खान त्याच्या भाचीसोबत गणपतीची आरती करत आहे. व्हिडीओमध्ये , सलमानने तेथे असलेल्या सर्व लहान मुलांना आरती पकडण्यास सांगितले. सोशल मीडियावर 'भाईजान'च्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT