पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा छोट्या पडद्यावर लोकप्रिय शो गेल्या अनेक वर्षांपासून होस्ट करत आहे. अनेक चाहते 'बिग बॉस' केवळ सलमानसाठी बघत असतात. अनेक दिवसांपासून सलमान 'बिग बॉस सीजन १८' ला होस्ट करणार नसल्याचे सांगितले जात होते. यामुळेच सलमानचे चाहते नाराज झाले. यावरच आता मोठा खुलासा करण्यात आला आहे. आता 'विग बॉस सीजन १८' ला सलमानच होस्ट करणार असल्याची माहिती समोर येत आहे. प्रकृती बिघडली असताना तो हा शो होस्ट करणार असल्याचे बोलले जात आहे.
येत्या काही दिवसांत सलमान शोचा शूट करणार असल्याचेही बोलले प्रोमो जात आहे. बिग बॉसचा १८ वा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीजनची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर 'बिग बॉस'च्या घरात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची एक यादी व्हायरल होतानाही दिसली. यामध्ये सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडच्या नावाचा देखील समावेश होता. विशेष म्हणजे, तिने सलमानवर गंभीर आरोपही केले होते. आता नव्या सीजनमध्ये काय काय घडते? हे नक्कीच रोमांचक असेल!.