Ranbir Kapoor Ramayana सध्या रामायण चित्रपटाची हवा देशभरात आहे या चित्रपट दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झाला असून नितेश तिवारी यांनी ‘रामायण : राइज ऑफ अ लिजेंड’ हा चित्रपट दिग्दर्शित केला असून त्याने पहिल्याच दिवशी ७७ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाबाबत सलमान खान याला प्रश्न विचारण्यात आला होता. सलमान त्याच्या मातृभूमी या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमाला उपस्थित होता. त्यावेळी त्याने रामायण या चित्रपटाबाबत आपले मत व्यक्त केले.
दरम्यान सलमान खान याला या चित्रपटाबाबत विचारणा करण्यात आली होती तेव्हा त्यांनी पत्रकाराच्या प्रश्नाला असे भन्नाट उत्तर दिले की सर्वजण अवाक झाले. रामायण पाहिला का, असे विचारल्यावर सलमान म्हणाला की पाहिला ना ‘रामानंद सागर’ यांचे रामायण पाहिले आहे. तो पुढे म्हणाला की "मला वाटते की 'रामायण'बद्दलची चर्चा ही मूळ 'रामायण' विषयावरच व्हायला हवी, ना की त्याच्या व्हीएफएक्स (VFX) किंवा निर्मिती खर्चावर. '४००० कोटींचे बजेट' आणि सतत 'व्हीएफएक्स, व्हीएफएक्स, व्हीएफएक्स' अशी चर्चा होणे, मला योग्य वाटत नाही.
रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेने संपूर्ण भारतावर गारुड केले होते. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला या मालिकेबाबत आस्था आहे. अरुण गोविल यांनी साकारलेले रामाचे पात्र आजही लोकांच्या स्मरणात आहे. राम, लक्ष्मण भरत माता सिता ज्यांनी ही पात्रे साकारली होती त्यांना लोक देव मानत असे. आता त्यानंतर रामायणावर अनेक चित्रपट मालिका आल्या पण मूळ रामायणाची सर कोणालाच नाही. त्यामुळे सलमान खानने केले हे भाष्य महत्वाचे ठरते
पापाराझीने विचारले की सध्या तिवारी दिग्दर्शित व रणबिर कपूर - साई पल्लवी , यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या रामायण चित्रपटाची चर्चा सुरु आहे याच अनुषंगाने सलमानला हा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी केवळ ३ सेकंदात सलमानने उत्तर दिले असून याची आता सोशल मिडीयावर चर्चा होत आहे.