Salman Khan-Somy Ali relationship
मुंबई- एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री सोमी अली आणि सलमान खान यांचे नाते सर्वश्रुत आहे. १९९१ ते १९९७ पर्यंतचा बॉलिवूडचा काळ गाजवणाऱ्या या अभिनेत्रीने कृष्ण अवतार, अंत, यार गद्दार, माफिया, चुप यासारख्या चित्रपटात काम केलं आहे. शिवाय ती सलमान खान सोबतच्या रिलेशनसीपमुळेही चर्चेत राहिली आहे.
त्यांच्या ब्रेकअप नंतर देखील तिच्या बद्दल अनेकदा चर्चा होत राहिल्या तर ती सलमान बद्दल अनेक खुलासे करत राहिलीय. आता तिच्या बद्दल एक गोष्ट समोर आलीय, ज्यामध्ये रागाच्या भरात सलमानने तिच्या डोक्यावर दारूची बाटली फोडली होती. त्यावेळी दोघे रिलेशनशीपमध्ये होते.
रिपोर्टनुसार, एका ज्येष्ठ महिला पत्रकाराने दोघांच्या रिलेशनशीप बद्दल खुलासा केला आहे. एक अशा घटनेचा खुलासा केला, जो सर्वांना हैराण करणारी आहे. नी दावा केला की, सलमानने एकदा पार्टीत सोमीच्या डोक्यावर बाटली फोडली होती.
एका पॉडकास्टमध्ये पत्रकाराने सलमान - सोमी अली बद्दल बातचीत केली. ती म्हणाली- ‘जेव्हा सोमी अली हिंदी इंडस्ट्रीमध्ये आली होती, तेव्हा ती माझी चांगली मैत्रीण होती. ती भाड्याच्या घरात राहायची. नंतर तिच्या वडिलांनी तिच्यासाठी फ्लॅट खरेदी केला होता. माझे सोमी अलीशी चांगले संबंध होते. तेव्हा एकदा तिने मला म्हटलं होतं की, मी सलमानशी प्रेम करते. पण सलमान करतो की नाही, माहिती नाही. मला कदी कधी भीती पण वाटते की, तो शॉर्ट टेम्पर्ड आहे.’
तिने सोमी अलीच्या डोक्यावर बाटली फोडल्याची घटना देखील सांगितली. तिने दावा केला की, 'एका रेस्ट्रो बारमध्ये कदाचित सोमी अली होती. ती मित्रांसोबत कोल्ड्रींक पित होती. तेव्हा सलमान तिथे आला आणि रागाच्या भरात त्याने सोमी अलीच्या डोक्यावर बाटली मारली. ही खूप वर्षांपूर्वीची घटना आहे. त्यावेळी सोमीने मला मोठी मुलाखत दिली होती. ती म्हणाली होती, सलमान अखिर असा का वागतो? तो खूप पजेसिव्ह आहे...हे सर्व सांगितलं होतं.’
रिपोर्टनुसार, सोमी अली म्हणाली-डोक्यावर बाटली फोडल्याची घटना केवळ एक अफवा आङे. जर असं काही घडलं अशतं तरी रुग्णालयात भरती असती. तिने सांगितलं की, कशाप्रकारे सलमानने तिच्या हातातील रम-कोलाचा ग्लास टेबलवर ओतला होता. ग्लासमध्ये दारू आणि कोला होते आणि ते तिने पहिल्यांदाच ट्राय केलं होतं.
सोमीने सांगितलं की, "आम्ही ड्रिंक मागवलं होतं आणि सलमान अचानक रेस्टॉरेंटमध्ये आला. तो माझ्या शेजारी बसला. मनीषा कोईराला देखील होती. त्याने मला विचारलं की, काय पित आहेस? मी घाबरून म्हटलं की, केवळ थम्सअप आहे. त्याने ती ड्रिंक टेस्ट केली ज्यामध्ये रम होती. त्याने रागाच्या भरात माझ्या केसांवर ती ड्रिंक फेकली आणि ग्लास टेबलवर आपटला."