सलमान खान- विक्की कौशल. (file photo)
मनोरंजन

सलमान खानचा 'सिकंदर' विक्की कौशलच्या 'छावा'ला मागे टाकू शकला नाही

Sikandar box office collection day 1 | पहिल्या दिवशी किती कमाई?

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याच्या 'सिकंदर' (Sikandar box office collection day 1) चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई अपेक्षापेक्षा कमी राहिली. हा चित्रपट पहिल्या दिवशी सुमारे ५० कोटींचा गल्ला जमवेल, असा अंदाज ट्रेड तज्ज्ञांनी बांधला होता. पण पहिल्या दिवशी या चित्रपटाने ३० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. सिकंदर ३० मार्च रोजी रिलीज झाला आहे.

याआधी २०१९ मध्ये सलमान खानच्या 'भारत' चित्रपटाने पहिल्या दिवशी ४२ कोटींचा गल्ला जमवला होता. सध्याच्या 'सिकंदर'ची पहिल्या दिवशीची कमाई अपेक्षेपेक्षा कमी असली तरीही सलमानने त्याच्या अनेक चित्रपटांच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचे आकडे मागे टाकले आहेत.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१० मधील सलमानच्या 'दबंग'ने पहिल्या दिवशी १४.५० कोटी, २०११ मधील 'बॉडीगार्ड'ने २१.६० कोटी, २०१२ मधील 'एक था टायगर'ने ३२.९३ कोटी, २०१४ मधील 'किक'ने २६.४० कोटी, २०१५ मधील 'बजरंगी भाईजान'ने २७.२५ कोटी, २०१६ मधील 'सुलतान'ने ३६.५४ कोटी, २०१७ मधील 'ट्युबलाईट' २१.१५ कोटी, २०१८ मधील 'रेस ३'ने २९.१७ कोटी, २०२३ मधील 'किसी का भाई किसी की जान'ने १५.८१ कोटी रुपयांची कमाई केली होती.

'सिकंदर' चित्रपटाचे बजेट २०० कोटींचे आहे. सलमान खानचा याआधीचा चित्रपट 'टायगर ३'ने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. 'सिकंदर'मध्ये सलमान सोबत रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत आहे. एआर मुरुगादॉस यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ज्यांनी याआधी आमिर खान याचा गजनी दिग्दर्शित केला आहे.

पहिल्या दिवशीच्या कमाईत 'छावा' अव्वल

दरम्यान, सिकंदर या वर्षातील सर्वात मोठे ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरलेला नाही. या वर्षी रिलीज झालेला विक्की कौशल (Vicky Kaushal) याचा 'छावा' (Chhaava) चित्रपट पहिल्या दिवशीच्या कमाईत अव्वल स्थानी आहे. १४ फेब्रुवारी रोजी रिलीज झालेल्या 'छावा'ने पहिल्या दि‍वशी बॉक्स ऑफिसवर ३१ कोटींची कमाई केली होती. 'छावा'चे कलेक्शन पाहाता 'सिकंदर' हा २०२५ मधील मोठे ओपनिंग मिळालेला दुसरा चित्रपट ठरला आहे.

'छावा' चित्रपट प्रदर्शित होऊन ४५ दिवस झाले आहेत. अजूनही या चित्रपटाला गर्दी कायम आहे. सुमारे १३० कोटी रुपये बजेटमध्ये बनलेल्या 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरून सुमारे ५९३.४५ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. 'छावा'ने 'पठाण' आणि 'अ‍ॅनिमल' सारख्या चित्रपटांचे रेकॉर्डही मोडले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT