सलमानच्या सुरक्षा ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पकडलं  Instagram
मनोरंजन

Salman Khan च्या सिक्युरिटीने तरुणाला पकडलं; बाईकवरून करत होता कारचा पिच्छा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क -१८ सप्टेंबरच्या मध्यरात्री तरुणांनी सलमान खानच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न केला होता. तो सलमानच्या कारच्या अगदी जवळ पोहोचला होता. त्यावेळी सलमानच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडले. २१ वर्षीय तरुणाचे नाव उज्जैर फैज मोहिउद्दीन असे म्हटले जात आहे. बाईकवरून हा तरूण भरधाव वेगाने सलमान खानच्या सिक्युरिटी ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न करत होता. बांद्रा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचे समजते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT