Salman Khan | ऐश्वर्या, अजय देवगणनंतर सलमानही कोर्टात file photo
मनोरंजन

Salman Khan | ऐश्वर्या, अजय देवगणनंतर सलमानही कोर्टात

प्रायव्हसी राईटस्; सेलिब्रिटींकडून कायदेशीर कारवाईचा वाढता ट्रेंड

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानने आपल्या व्यक्तिमत्त्व आणि प्रसिद्धी हक्कांच्या संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्या ओळखीचा अनधिकृत व्यावसायिक वापर करणार्‍यांविरोधात कायदेशीर पाऊल उचलणार्‍या सेलिब्रिटींच्या वाढत्या यादीत आता सलमानच्या नावाचाही समावेश झाला आहे.

पूर्वपरवानगीशिवाय वापर नको

आपल्या याचिकेत सलमान खानने विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, वेबसाइटस् आणि ई-कॉमर्स कंपन्यांना त्याचे नाव, फोटो, आवाज, किंवा त्याच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख पटेल अशा कोणत्याही गोष्टीचा पूर्वपरवानगीशिवाय वापर करण्यापासून रोखण्याची न्यायालयाला विनंती केली आहे.

नागरिकांची दिशाभूल

याचिकेनुसार, अशा प्रकारच्या अनधिकृत वापरामुळे केवळ अभिनेत्याच्या व्यक्तिमत्व हक्कांचे उल्लंघन होत नाही, तर खोट्या जाहिराती किंवा संबंध दर्शवून लोकांची दिशाभूलही केली जाते. यामुळे तिसर्‍या पक्षांना त्याच्या प्रतिष्ठेचा वापर करून फायदा उचलण्याची संधी मिळते.

व्यक्तिमत्व आणि प्रसिद्धी हक्क म्हणजे काय?

व्यक्तिमत्व किंवा प्रसिद्धी हक्क एखाद्या व्यक्तीला त्याचे नाव, प्रतिमा, दिसणे, आवाज किंवा इतर वैयक्तिक ओळखण्यायोग्य वैशिष्ट्यांच्या वापराचे नियंत्रण करण्याचा आणि त्यातून व्यावसायिक लाभ मिळवण्याचा कायदेशीर अधिकार देतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT