गेल्या काही दिवसांध्ये ईशा रिखी चर्चेत आहे. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आलीय, ते म्हणजे बिग बॅस २० या सीझनमुळे. पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीने 'बिग बॉस २०'च्या घरात पाऊल ठेवताच तिच्या वैयक्तिक आयुष्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शोच्या ग्रँड प्रीमियरदरम्यान ईशाने तिच्या तुटलेल्या नात्याबद्दल भाष्य केले, ज्यावर होस्ट सलमान खानने तिला भूतकाळ विसरून वर्तमानावर लक्ष केंद्रित करण्याचा मोलाचा सल्ला दिला.
सलमानचा ईशाला 'मूव्ह ऑन'चा मंत्र
मंचावर संभाषणादरम्यान सलमानने ईशाला भूतकाळातील कटू आठवणी मागे सोडण्यास सांगितले. सलमान म्हणाला, "जे काही घडलं ते तिथेच सोडून दे आणि आयुष्यात पुढे जा. तुझ्या भूतकाळात जे काही घडलं आहे, त्यातील दुसरी व्यक्ती (नेक्स्ट पार्टी) आधीच पुढे निघून गेली आहे."
यानंतर सलमानने ईशाला विचारले की तिला मंचावर तिच्या माजी जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे का? परंतु ईशाने नाव न घेण्याचा निर्णय घेतला. सलमाननेही तिच्या या निर्णयाचे कौतुक करत तिला पाठिंबा दिला.
"कोणाचं ब्रेकअप होत नाही?" सलमानने हलका केला माहौल
ईशा भावूक झालेली पाहून सलमानने वातावरणातील गांभीर्य कमी करत तिला थेट शब्दांत पटवून दिले. तो म्हणाला, "एक ब्रेकअप झालं तर काय झालं? एका ब्रेकअपसाठी इतकं रडायचं असतं का? इथे कोणाचं ब्रेकअप झालं नाहीये?"
बादशाहसोबतच्या नात्याचा अधिकृत शेवट
'बिग बॉस २०'मध्ये येण्यापूर्वी अवघ्या काही दिवसांपूर्वी, म्हणजेच ३१ ऑगस्ट रोजी ईशा रिखी आणि प्रसिद्ध रॅपर बादशाह यांनी परस्पर संमतीने वेगळे झाल्याची घोषणा केली होती. दोघांनी सोशल मीडियावर संयुक्त निवेदन जारी करत एकमेकांबद्दल आदर व्यक्त केला होता आणि या काळात चाहत्यांना गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन केले होते.
प्रोमोमधील भावूक क्षण
शोच्या प्रीमियरपूर्वी रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये ईशा तिच्या तुटलेल्या विश्वासाबद्दल बोलताना ढसाढसा रडताना दिसली होती. "मला प्रेम झालं होतं, पण जेव्हा नात्यांमधील विश्वास तुटतो..." असे म्हणत तिने तिचा हृदयभंग व्यक्त केला होता. मात्र, सलमानच्या सल्ल्यानंतर आता ईशा बिग बॉसच्या घरात भूतकाळ विसरून कशी खेळते, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.