Salman Khan injured on Ladakh set of Battle of Galwan
मुंबई - बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो आपल्या आगामी चित्रपट ‘बॅटल ऑफ गलवान’च्या लडाखमधील शूटिंगदरम्यान जखमी झाला आहे. लडाखच्या सेटवर जखमी झाल्यानंतर सलमान खान बरा होण्यासाठी मुंबईत परतला असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे सलमान खानने ‘बॅटल ऑफ गलवान’चे लडाखमधील शूटिंग थांबवले आहे.
जबरदस्त ॲक्शन आणि इमोशनल सीन्स शूट करताना अतिथंड तापमानात जखमा सहन करत तो शूट करत होता. चित्रपटाच्या टीमने ४५ दिवस शूटिंग केले. त्याठिकाणी सलमान १५ दिवसांसाठी शूटकरिता आला होता. यावेळी ॲक्शन्स सीन्स साकारताना त्याला दुखापत झाली असून सध्या तो वैद्यकीय उपचार घेत आहे. याठिकाणी अत्यंत शीत हवामानामुळे अन्य कलाकारांना प्रचंड आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
अपूर्व लाखिया यांचे दिग्दर्शन असलेला ‘बॅटल ऑफ गलवान’ सध्या जोरदार चर्चेत आहे. चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच निर्मात्यांकडून डेटची घोषणा करण्यात येईल. सलमान खानने या चित्रपटासाठी खूप मेहनत गेतली असून लडाखमध्ये चित्रपटाचे एक शेड्यूल थांबवून मुंबईत आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, लडाखमध्ये चित्रपटाच्या टीमने जवळपास १० डिग्रीहून कमी तापमानात शूटिंग केलं आहे. त्यामुळे सलमान अनेकदा दुखापत झाली आहे. आता तो काही दिवस मुंबईत आराम करेल, त्यानंतर मुंबईमध्येच चित्रपटाच्या काही महत्त्वाच्या दृश्यांचे चित्रीकरण होईल. यामध्ये ॲक्शन सीन असतील तसेच काही इमोशनल सीन्सदेखील असतील.
सलमानने इन्स्टाग्रामवर पहिली झलक दाखवली होती. त्याने सैनिकाच्या भूमिकेतील आपला लूक शेअर केला होता. चित्रपटात अभिनेत्री चित्रांगदा दिसणार आहे.