सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई कडून एकदा धमकीचा संदेश Pudhari Photo
मनोरंजन

Salman Khan| सलमानसोबतच बिश्नोईवर 'ते' गाणं लिहणाऱ्याला एक महिन्यात संपवणार..!

Salman Khan| बिश्नोईकडून सलमान खानला पुन्हा एकदा धमकी वजा इशारा

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan Gets Death Threat) याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. असा संदेश गुरुवारी (दि.10) मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला मिळाला. यानंतर पुन्हा एकदा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून हा संदेश मिळाला आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काय लिहिले आहे धमकीमध्ये?

धमकीमध्ये लिहिले आहे की, एका महिन्याच्या आत गाणे लिहिणाऱ्याला ठार मारले जाईल, गाणे लिहिणाऱ्या व्यक्तीची स्थिती अशी होईल की तो स्वत:च्या नावाने गाणे लिहू शकणार नाही. सलमानमध्ये हिंमत असेल तर त्यांनी त्यांना वाचवावे. हा इशारा या धमकीमध्ये लिहिला आहे. याप्रकरणी मुंबईच्या वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धमकी कोणत्या क्रमांकावरून आली याचा शोध घेण्यात पोलीस व्यस्त आहेत. मात्र, हे गाणे कोणते आहे आणि कोणी लिहिले आहे... ही माहिती धमकीच्या संदेशात देण्यात आलेली नाही.

सलमानला धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अनेकवेळा सलमानला धमकी मिळाली होती. 2022 मध्ये सलमानला धमकीचे पत्र त्याच्या निवासस्थानाजवळ सापडले होते. त्याला मार्च 2023 मध्ये गोल्डी ब्रारने कथितपणे पाठवलेला ईमेलदेखील मिळाला. 2024 मध्ये दोन अज्ञातांनी बनावट ओळखीचा वापर करुन पनवेलमधील सलमानच्या फार्महाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT