Salman Khan relief in Movie Kala Hiran Case  pudhari photo
मनोरंजन

Movie Kala Hiran Case | सलमान खानला मोठा दिलासा, सोशल मीडियावरून 'काला हिरण'शी संबंधित लिंक्स हटवण्याचे कोर्टाचे आदेश

Movie Kala Hiran Case | सलमान खानला मोठा दिलासा, सोशल मीडियावरून 'काला हिरण'शी संबंधित लिंक्स हटवण्याचे कोर्टाचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

'काला हिरण' चित्रपटाशी संबंधित कायदेशीर लढाईने एक नवीन वळण घेतले आहे. दिल्ली हायकोर्टाने काला हिरण : द बॅटल फॉर लेगेसी चित्रपटाशी संबंधित टीझर, लिंक्स सोशल मीडियावरून हटवण्याचे निर्देश दिले आहेत.

काला हिरण : द बॅटल फॉप लेगेसी हा चित्रपट तथाकथित सलमान खानच्या १९९८ मधील काळवीट (blackbuck) शिकार प्रकरणावर आधारित आहे. यातील कंटेंटमुळे अभिनेता सलमान खानच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचू शकते, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आणि २४ तासांच्या आत सोशल मीडियावरून तो टीझर काढून टाकण्याचे आदेश दिले. न्यायमूर्तींनी स्पष्ट केले की, जर निर्मात्याने टीझर काढून टाकण्यात कसूर केली, तर 'X' (ट्विटर) आणि 'YouTube' सारख्या प्लॅटफॉर्म्सना त्या लिंक्स काढून टाकण्याचे निर्देश दिले जातील.

निर्मात्यांची भूमिका काय?

अमित जानी यांच्या वकिलांनी सांगितले की, तो फक्त एक टीझर होता आणि त्यात सलमान खानच्या नावाचा उल्लेखही नव्हता. यात कोणत्याही एआय वा डीपफेकचा वापर केला गेलेला नाही.

सलमान खानचा युक्तिवाद

सलमान खानच्या वकिलाने सांगितले की, काळवीट शिकार प्रकरणाशी संबंधित चारपैकी तीन प्रकरणांतून त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे, तर एका प्रकरणातील शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. सलमान खानच्या म्हणण्यानुसार, चित्रपटात त्याला अंडरवर्ल्डशी संबंध असलेला दाखवण्यात आले आहे. त्यात बदनामीकारक कंटेंट वापरण्यात आला आहे, ज्यामुळे त्याच्या 'पर्सनॅलिटी राईट्स'चे उल्लंघन होते. या चित्रपटामुळे त्याच्या निष्पक्ष खटल्याच्या अधिकारावर परिणाम होऊ शकतो, कारण कथित काळवीट शिकार प्रकरणाची कार्यवाही राजस्थान हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात अजूनही प्रलंबित आहे.

सलमान खानने पुढे नमूद केले की, चित्रपटाच्या पोस्टरवर खानशी हुबेहूब साम्य असलेले पात्र दाखवण्यात आले आहे आणि त्या पात्राच्या हातात अभिनेत्याशी संबंधित असलेले प्रसिद्ध ब्रेसलेटही दाखवले आहे.

या याचिकेत असा दावाही करण्यात आला की, सलमान खानने चित्रपट काला हिरणच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर अमित जानी यांनी एका मुलाखतीवेळी ती जाहीरपणे फाडून टाकली आणि नंतर सोशल मीडियावर असा आरोप केला की, त्यांना त्या अभिनेत्याकडून आणि अंडरवर्ल्डकडून धमकावले जात आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

' काला हिरण: द बॅटल फॉर लेगेसी' या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सलमान खानने दिल्ली हायकोर्टात दाखल केल्यावर हा वाद सुरू झाला. त्याने दावा केला की, हा चित्रपट त्याच्या काळवीट शिकारीच्या प्रकरणावर आधारित असून त्यामुळे त्याच्या प्रतिमेला धक्का लागू शकतो. त्याने कोर्टाला चित्रपटाशी संबंधित सर्व पोस्टर्स, टीझर्स हटवले जाण्याची मागणी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT