Bigg Boss -19 theme to salman khan charges
मुंबई - बिग बॉस १९ चा प्रोमोपासून या रिअॅलिटी शो ची चर्चा होत आहे. टीव्हीवर हा शो पुन्हा वापसी करत आहे. या शो चा होस्ट सलमान खानने २१ जुलै रोजी प्रोमो शूट केला होता. आता रिपोर्टनुसार, शोमध्ये काही बदल करण्यात आल्याची माहिती समोर येतेय. विशेषत: शो ची थीम आणि प्रारूपमध्ये मोठा बदल केला जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, बिग बॉस १९ च्या थीममध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) चा खूप वापर करण्यात येणार आहे. निर्माता एलिमिनेशन प्रक्रियामध्ये मोठ्या बदलासोबत अनेक नवे ट्विस्ट देखील सादर केले आगेत. आता बिग बॉसच्या घरातील मंडळींकडे कोण एलिमिनेट होणार, हा निर्णय घेण्याचा अधिकार असेल.
या सीजनचे सूत्रसंचालन सलमान खानच असेल. आता 'बिग बॉस १९' साठी सलमान किती फी घेणार, याचा मोठा खुलासा जाला आहे. प्रती आठवडे किती कोटी रुपये जाणून घेऊया.
रिपोर्टनुसार, सलमानने शो 'बिग बॉस १९' साठी निर्मात्यांकडून १२०-१५० कोटी रुपये घेतल्याचे म्हटले जात आहे. १५ आठवडे हा शो चालणार असून त्याला प्रत्येक आठवड्याला ८ ते १० कोटी रुपये मिळतील.
याआधी 'बिग बॉस OTT २' साठी लिए सलमानने ९८ कोटी रुपये घेतले होते. बिग बॉस १९ ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात म्हमजेच २९ आणि ३० ऑगस्टला सुरु होईल.
स्पर्धकांमध्ये गौतमी कपूर, धीरज धूपर, अलीशा पवार, लता सभरवाल, आशीष विद्यार्थी, मुनमुन दत्ता, अनीता हसनंदानी, कृष्णा श्रॉफ, अर्शिफा खान, तनुश्री दत्ता, शरद मल्होत्रा, कनिका मान, राज कुंद्रा, डेजी शाह, ममता कुलकर्णी, मिकी मेकओवर, पारस कलनावत यांच्या नावाची चर्चा आहे.
छोट्या पडद्यावर चर्चित रिॲलिटी शो 'बिग बॉस' १९ सीझनची प्रतीक्षा आता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.