Battle of Galwan changed name and new poster out now  instagram
मनोरंजन

Battle of Galwan changed name | गलवान खोऱ्यातील शौर्याची गाथा आता नव्या टायटलसह; थरारक पोस्टर रिलीज

मोठी बातमी! सलमानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’चं नाव बदललं; 'या' नव्या नावासह थरारक पोस्टर रिलीज.

स्वालिया न. शिकलगार

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, आता निर्मात्यांनी या चित्रपटाचे नाव बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाचे नवीन नाव आता ‘मातृभूमि: मे वॉर रेस्ट इन पीस’ असे असेल. नुकतेच या चित्रपटाचे एक नवीन आणि आक्रमक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे, ज्यामध्ये सलमान खान भारतीय लष्कराच्या गणवेशात दिसत आहे. गलवान खोऱ्यातील भारतीय सैनिकांच्या अतुलनीय शौर्यावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक भावनिक आणि अंगावर शहारे आणणारा अनुभव असणार आहे.

Battle of Galwan changed name and new poster released

गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा असलेल्या 'बॅटल ऑफ गलवान' (Battle of Galwan) या चित्रपटाबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा देशभक्तीपर चित्रपट बॅटल ऑफ गलवानचे टायटल बदलण्यात आले आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचे नाव बदलून आता 'मातृभूमि: मे वॉर रेस्ट इन पीस' असे केले आहे.

नवे नाव आणि आक्रमक पोस्टर

चित्रपटाचे नाव बदलण्यासोबतच एक नवीन पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये सलमान खान भारतीय लष्कराच्या जवानाच्या भूमिकेत असून, त्याच्या चेहऱ्यावर रक्ताचे डाग आणि डोळ्यांत अंगार दिसत आहे. गलवान खोऱ्यातील बर्फाच्छादित डोंगररांगांच्या पार्श्वभूमीवर हे पोस्टर अतिशय 'थराररक' दिसत आहे.

नवे नाव आणि आक्रमक पोस्टर

चित्रपटाचे नाव बदलण्यासोबतच एक नवीन पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये सलमान खान भारतीय लष्कराच्या जवानाच्या भूमिकेत असून, त्याच्या चेहऱ्यावर रक्ताचे डाग आणि डोळ्यांत अंगार दिसत आहे. गलवान खोऱ्यातील बर्फाच्छादित डोंगररांगांच्या पार्श्वभूमीवर हे पोस्टर अतिशय 'थराररक' दिसत आहे.

सलमान खानने नवे पोस्टर इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. दमदार नवे पोस्टर रिलीज करताना नाव देखील बदलले "Maatrubhumi : May War Rest in Peace" (युद्धाला शांती मिळो). एक नवा मेसेज या टॅगलाईन द्वारे देण्यात आला आहे. केवळ संघर्ष-भांडण करून, संपूर्ण जगात शांतीची अपेक्षा केली जात आहे. सलमान खानचा हा चित्रपट गलवान घाटीतील युद्ध ऐतिहासिक घटनेशी प्रेरित आहे.

कधी होणार प्रदर्शित?

या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक अपुर्व लखिया (Apoorva Lakhia) करत आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण लडाख आणि काश्मीरमधील वास्तविक ठिकाणी करण्यात आले आहे. हा चित्रपट १७ एप्रिल, २०२६ रोजी रिलीज होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT