मनोरंजन

ईद मुबारक…; दोन खानसह बॉलिवूड स्टार्सची बकरी ईद उत्साहात साजरी (video)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : सण-उत्सव म्हणजे एकमेकांच्या आनंदात सहभागी होण्याची उत्तम संधी होय. दरम्यान आज सर्वत्र बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यात बॉलिवूडचे स्टार्सही कसे मागे राहतील. बॉलिवूड अभिनेता सलमान खान, किंग खान म्हणजे, अभिनेता शाहरूख खान, अनिल कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, सनी देओल, हिना खान, देशी गर्ल प्रियांका चोप्रा यासारख्या अनेक कलाकारांनी बकरी ईद साजरी करत सोशल मीडियावर शुभेच्छाचा वर्षाव केलाय.

सलमान खान

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने त्याच्या अपार्टमेंट बाहेर येवून चाहत्यांना बकरी ईदच्या भऱभरून शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने व्हाईट रंगाच्या शर्टमध्ये गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाल्कनीत येऊन चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बंगल्या भोवती कडेकोट बंदोबस्त होता.

शाहरुख खान

बॉलिवूडचा किंग खान म्हणजे, प्रसिद्ध असलेला अभिनेता शाहरुख खान यानेही आज बकरी ईदच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या खास प्रसंगी त्यांने घराच्या बाल्कनीतून हस्तांदोलन करून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी तो व्हाईट रंगाच्या पठाणी वेशभूषेत खूपच सुंदर दिसला.

प्रियांका चोप्रा

देशी गर्ल म्हणजे, बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा इन्स्टाग्राम स्टोरीवरून ईद उल अजाह म्हणत बकरी ईदच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अनिल कपूर

अभिनेता अनिल कपूरनेही चाहत्यांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने आज त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये काही चाहते प्रार्थना करताना हात वर केलेले दिसत आहेत.

सिद्धार्थ मल्होत्रा

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानेही बकरी ईदच्या या या खास प्रसंगी लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. एक फोटो शेअर करताना त्याने लिहिलं आहे की, ईद-उल-अजहा निमित्त देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुख, शांती आणि समृद्धी देवो. नुकताच सिद्धार्थ 'योधा' या चित्रपटात दिसला होता.

सनी देओल

बॉलिवूडचा प्रसिद्ध सुपरस्टार सनी देओलने आज बकरी ईद-उल-अझाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अनुपम खेर

बॉलिवूड अभिनेता अनुपम खेरने यंदाची बकरी ईद चाहत्यांसोबत साजरी केली. त्याने चाहत्यासह अनेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

रकुल प्रीत सिंह

रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांनी बकरी ईदच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्यात.

(VIDEO : viralbhayani instagram वरून साभार)

SCROLL FOR NEXT